-
दरवर्षी जून महिन्याचा तिसरा रविवार हा फादर्स डे म्हणून साजरा केला जातो, जो व्यक्ती आपण काहीही न बोलता आपली प्रत्येक गरज समजून घेतो, जो आपण पडण्यापूर्वीच आपल्याला साभाळतो, त्या आपल्या वडिलांसाठी हा दिवस समर्पित असतो.
-
तर या फादर्स डे २०२५ (१५ जून) वडिलांना अशी भेट का देऊ नये जी फक्त एक गोष्ट नसेल तर एक भावना असेल. जाणून घेऊ बाबांसाठीच्या काही खास आणि अनोख्या भेटवस्तूंच्या आयडीयाबद्दल…
-
वैयक्तिकृत भेटवस्तू
१. कस्टम फोटो फ्रेम – कुटुंबाच्या फोटोसह एक सुंदर संदेश.
२. त्यांचे नाव असलेला मग किंवा कुशन – “जगातील सर्वोत्तम बाबा” असा मजकूर लिहू शकता.
३. वैयक्तिकृत वॉलेट – त्यांचे नाव किंवा आद्याक्षरे असलेले.
४. घड्याळ – मागच्या बाजूला एक विशेष संदेश असलेले. -
अन्नप्रेमी वडिलांसाठी
१. सुकामेवा गिफ्ट बॉक्स
२. गॉरमेट चॉकलेट्स किंवा कुकीज
३. कॉफी प्रेमींसाठी प्रीमियम कॉफी सेट
४. त्यांच्या आवडत्या पदार्थाचा घरगुती केक किंवा सरप्राईज डिनर -
तंत्रज्ञान आणि गॅझेट्सची आवड असलेल्या वडिलांसाठी
१. स्मार्टवॉच किंवा फिटनेस बँड
२. ब्लूटूथ इअरबड्स किंवा स्पीकर्स
३. मोबाईल स्टँड + वायरलेस चार्जर
४. कस्टम कीबोर्ड/माऊस किंवा लॅपटॉप बॅग -
पुस्तकप्रेमी बाबांसाठी
१. तुमच्या आवडत्या लेखकाचा पुस्तक संच
२. ई-बुक रीडर (किंडल सारखे)
३. बुकमार्कसह वैयक्तिकृत नोटबुक -
सौंदर्य आणि स्टायलिंगसाठी
१. ग्रूमिंग किट (ट्रिमर, शेव्हिंग क्रीम, परफ्यूमचा उत्तम कॉम्बो)
२. वैयक्तिक हॅम्पर (स्कीन केअर, हेअर केअर)
३. स्टायलिश बेल्ट + वॉलेट + टाय गिफ्ट सेट -
छंदानुसार भेटवस्तू
१. जर ते कलाप्रेमी असतील तर चित्रकला संच
२. जर ते छायाचित्रकार असतील तर कॅमेरा अॅक्सेसरी
३. बोर्ड गेम
४. डीवायआय टूलकिट -
अनुभवात्मक भेटवस्तू
१. स्पा व्हाउचर किंवा आरामदायी मसाज सत्र
२. आठवड्याच्या शेवटी सहल किंवा लहान कुटुंब सहल
३. डे आउट (चित्रपट + डिनर कॉम्बो)
४. कुकींग क्लास आर्ट वर्कशॉप
हेही पाहा-जोडीदाराबरोबरची तुमची पावसाळी पिकनिक बनेल अविस्मरणीय; भारतातल्या ‘या’ ८ ठिकाणांना भेट द्या…
Father’s Day 2025: यावर्षी ‘फादर्स डे’ला ‘या’ गोष्टी करुन जिंका वडिलांचे मन; पाहा २५ आयडिया ज्यामधून भेटवस्तू प्लान करता येईल!
Father’s Day 2025 Gifts : फादर्स डे हा फक्त भेटवस्तू देण्याचा दिवस नाही, तर तो त्यांना ते आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत याची जाणीव करून देण्याचा दिवस आहे. भेटवस्तू छोटी असो वा मोठी, प्रेम आणि भावना या त्यात सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत.
Web Title: Fathers day 2025 best gift ideas for every kind of dad spl