-
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये थकवा, चक्कर येणे, दम लागणे ही लक्षणं अनेकांना जाणवतात. यामागे एक सामान्य कारण असू शकते, हिमोग्लोबिनची कमतरता.
हिमोग्लोबिन हे रक्तातील एक महत्त्वाचे प्रथिने असून ते शरीरभर ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. त्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी आयर्नयुक्त आहार घेणे आवश्यक असते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा नैसर्गिकरित्या हिमोग्लोबिन वाढवता येते आणि त्यासाठी आपल्या रोजच्या आहारात काही भाज्या समाविष्ट करणं हे सर्वात सोपं आणि प्रभावी उपाय आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
-
१. पालक (Spinach)
हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या भाज्यांमध्ये पालक आघाडीवर आहे. यात भरपूर आयर्न, फॉलिक अॅसिड आणि फायबर्स असतात. रोजच्या आहारात पालकाची भाजी, पराठा किंवा सूप असायला हवे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
२. बीट (Beetroot)
बीट ही भाजी केवळ आयर्नच नाही तर फॉलिक अॅसिडचाही उत्तम स्रोत आहे. यामुळे नवीन रक्त पेशी निर्माण होतात. बीट रस किंवा भाजी, कोणत्याही प्रकारे खाल्ल्यास उपयोग होतो. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
३. शेवग्याची पाने (Drumstick Leaves)
ही भाजी सुपरफूड मानली जाते. यामध्ये आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन A भरपूर प्रमाणात असते. शेवग्याच्या पानांची भाजी किंवा भजी फार पौष्टिक असते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
४. गाजर (Carrot)
गाजरात बीटा-कॅरोटीन आणि थोडेसे आयर्न असते. गाजराच्या सेवनामुळे हिमोग्लोबिनची कार्यक्षमता वाढते. गाजराचा रस किंवा कोशिंबीर फायदेशीर असते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
५. मेथी (Fenugreek Leaves)
मेथीची भाजी आयर्न आणि फायबर्सचा चांगला स्रोत आहे. पचनासाठीही उत्तम असल्यामुळे शरीर आयर्न सहज शोषू शकते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
६. तीळ (Sesame Seeds)
थोडेसे पण गुणकारी! तीळ विशेषतः आयर्नने भरलेले असतात. हे आपल्या आहारात चटणी, लाडू, पराठा किंवा ताकात मिसळून सहज समाविष्ट करता येतात. यामध्ये कॅल्शियम, झिंक आणि आयर्न असतात, जे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स) -
हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी बाजारातील पूरक आहार किंवा गोळ्यांवर अवलंबून राहण्याऐवजी, आपल्या घरच्या स्वयंपाकघरातील या पोषणमूल्यांनी भरलेल्या भाज्यांचा उपयोग करा.
आजारावर उपचार करण्यापेक्षा, आरोग्य जपणं नेहमीच शहाणपणाचं. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)
हिमोग्लोबिनची कमतरता? आहारात ‘हे’ पदार्थ नक्की समाविष्ट करा
हिमोग्लोबिनची कमतरता ही आजच्या जीवनशैलीतील एक सामान्य पण गंभीर समस्या आहे. औषधांऐवजी नैसर्गिक आणि घरच्या घरी उपलब्ध असलेल्या आयर्नयुक्त भाज्यांचा आहारात समावेश केल्यास शरीरात हिमोग्लोबिनची पातळी नैसर्गिकरित्या वाढवता येते.
Web Title: 6 natural superfoods to boost hemoglobin levels naturally svk 05