-
पावसाळा सुरू होताच घरात माश्यांची गर्दी होते आणि त्यांच्या त्रासामुळे डोकेदुखी सुरू होते. केवळ त्रासच नाही, तर माश्या डेंग्यू, टायफॉईडसारखे रोगही पसरवतात. आर्द्रतेमुळे कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो आणि घराचा कोपरा कोपरा अस्वच्छ वाटू लागतो. विशेषतः माश्या हे सर्वात त्रासदायक कीटक ठरतात. तुम्हीही या समस्येने हैराण असाल तर हे घरगुती उपाय तुमच्यासाठी वरदान ठरू शकतात. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
पावसाळ्यात माश्यांची संख्या झपाट्याने वाढते आणि घरात अस्वच्छतेचं वातावरण निर्माण होतं. पण, काळजी करू नका! डिजिटल क्रिएटर शशांक अलशी यांनी शेअर केलेल्या घरगुती स्प्रेच्या मदतीने तुम्ही सहज माश्यांपासून सुटका करून घेऊ शकता. हा सोपा आणि नैसर्गिक उपाय तुम्हाला हानिकारक रसायनांशिवाय संरक्षण देईल. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
घरात माश्यांचा त्रास सुरू झाला आहे का? मग हा सोपा आणि घरगुती स्प्रे नक्की वापरून पाहा! १ कप पाण्यात १ लिंबाचा रस आणि २ चमचे मीठ मिसळा. हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरा आणि जिथे माश्या दिसतील तिथे फवारा. लिंबाच्या आंबट वासामुळे माश्या त्या ठिकाणी थांबत नाहीत. केमिकल्सविना सुरक्षित आणि प्रभावी उपाय. (फोटो: फ्रीपिक)
-
घरात माश्यांचा उच्छाद माजलाय? मग वापरून पाहा मीठ आणि काळी मिरीपासून तयार केलेला नैसर्गिक स्प्रे! एका स्प्रे बाटलीत पाणी भरा, त्यात थोडं मीठ आणि काळी मिरी पावडर मिसळा. हे मिश्रण माश्या दिसणाऱ्या जागांवर फवारा आणि बघा माश्या कशा उडून जातात. हा घरगुती उपाय सोपा, सुरक्षित आणि अतिशय प्रभावी आहे. (फोटो: फ्रीपिक)
-
आलं फक्त औषधच नाही तर माश्यांवरही परिणामकारक उपाय ठरतो! एका वाटी पाण्यात एक चमचा आल्याची पावडर मिसळा आणि हे मिश्रण स्प्रे बाटलीत भरा. जिथे माश्या दिसतील तिथे फवारा करा. आल्याच्या तीव्र वासाने माश्या दूर पळतात. हा नैसर्गिक आणि सुलभ उपाय तुमच्या घराचं संरक्षण करतो, तेही रसायनांशिवाय. (छायाचित्र: फ्रीपिक)
पावसाळ्यामध्ये घोंगावणा-या माशांचा त्रास होतोय? घरीच तयार करा ‘हे’ शक्तिशाली नैसर्गिक स्प्रे
माशी दूर करणारे: पावसाळ्यात, माश्यांसह कीटकांचा प्रादुर्भाव वाढतो. माश्या रोग देखील पसरवतात. माश्या दूर करण्यासाठी येथे काही घरगुती उपाय आहेत. यासाठी तुम्हाला बाजारातून काहीही खरेदी करण्याची आवश्यकता नाही.
Web Title: Monsoon mosquito problem try easy home spray svk 05