-

खूप जणांना सकाळी उठल्यावर चेहऱ्यावर सूज किंवा फुगीरपणा जाणवतो. त्यामागे रात्रीचं उशिराचं किंवा खारट जेवण कारणीभूत असतं. झोपेत असताना शरीर द्रव पदार्थ बाहेर टाकू शकत नाही, त्यामुळे रात्रभर चेहऱ्यावर फुगीरपणा राहतो, असे वोक्हार्ट हॉस्पिटलच्या डॉ. ऋतुजा उगलमुगले सांगतात. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
लवकर आणि योग्य वेळी जेवण केल्यानं चेहऱ्यावरील फुगीरपणा कमी होऊ शकतो. पण, ही केवळ एक सवय असून, त्याचे संपूर्ण परिणाम हायड्रेशन, पचन आणि संपूर्ण जीवनशैली यांवर अवलंबून असतत, असे डॉ. जयदीप पालेप (जसलोक हॉस्पिटल) स्पष्ट करतात. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
जर तुम्ही दिवस लवकर सुरू केला आणि नाश्ता वेळेवर केला, तर तुमचं पचन व्यवस्थित होतं. डॉ. पालेप सांगतात, “दुपारपर्यंत जेवण संपवणं आणि रात्रीचं जेवण संध्याकाळी ७ पर्यंत खाणं योग्य. त्यामुळे झोपायच्या वेळेपर्यंत पचन पूर्ण होऊ शकतं.” (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
तज्ज्ञ सांगतात की, झोपण्याच्या दोन-तीन तास आधी जेवण झालं पाहिजे. त्यामुळे पचनशक्ती सुधारते, झोप चांगली लागते आणि सकाळी चेहऱ्यावरील फुगीरपणा कमी दिसतो. डॉ. ऋतुजा उगलमुगले सांगतात की, यामुळे शरीरात द्रवांचं संतुलन राखलं जातं आणि चयापचय प्रक्रिया सुरळीतपणे चालते. (छायाचित्र: पेक्सेल्स)
-
डॉ. जयदीप पालेप यांच्या मते, रात्री उशिरा जेवल्यास शरीरातील कॉर्टिसोल आणि इन्सुलिनची पातळी बिघडते. हे हार्मोन्स द्रव साठवून ठेवण्याशी आणि सूज येण्याशी संबंधित आहेत. त्यामुळे फुगीरपणा आणि शरीरात जळजळ होण्याची शक्यता वाढते. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
डॉ. उगलमुगले यांचे म्हणणे आहे की, जर चेहऱ्यावर सूज वारंवार येत असेल, अचानक वाढत असेल, ती फक्त एकाच बाजूला असेल किंवा त्यासोबत इतर त्रास जाणवत असतील (जसे पुरळ, थकवा, श्वास घेण्यास अडचण, वजनवाढ), तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही लक्षणे थायरॉईड, मूत्रपिंड विकार, अॅलर्जी किंवा हार्मोनल समस्या दर्शवू शकतात. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
डॉ. जयदीप पालेप सांगतात की, चेहऱ्यावरील फुगीरपणा कमी करायचा असेल, तर लवकर जेवणासोबतच इतर सवयींनाही महत्त्व द्या. खूप मीठ खाणं, मद्यपान, झोपेचा अभाव, कमी पाणी पिणं, अॅलर्जी, पीएमएस किंवा शरीरात असलेली सूज हे सगळे घटक फुगीरपणाचे कारण ठरू शकतात. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
डॉ. पालेप यांच्या टिप्स :
१. पाणी भरपूर प्या– दररोज २.५ ते ३ लिटर.
२. मीठ व साखर कमी करा– विशेषतः रात्रीच्या जेवणात.
३. पोटॅशियमयुक्त आहार घ्या– केळी, पालक, नारळपाणी हे उपयोगी पडतात. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक) -
४. चेहऱ्याला सौम्य मसाज द्या- रक्तप्रवाह सुधारतो.
५. उंच उशी वापरा आणि चांगली झोप घ्या- द्रव साठण्यात अडथळा येतो.
६. अल्कोहोल आणि कोल्ड्रिंक्स रात्री टाळा– सूज वाढू शकते.
७. आवश्यकतेनुसार उपवास करा– पचन सुधारते आणि शरीरातील दाह कमी होतो. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
सकाळी चेहऱ्यावर सूज येते; त्यामागची कारणं आणि उपाय काय? जाणून घ्या…
चेहऱ्यावरील सूज व्यवस्थापित करण्यासाठी लवकर जेवण हे एक उपयुक्त आणि नैसर्गिक जीवनशैलीचे साधन आहे परंतु तज्ञांनी मंजूर केलेल्या या उपायांमुळे त्यांचा परिणाम वाढतो.
Web Title: Morning puffy face reasons and remedies svk 05