• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. why we do circumambulation around peepal tree scientific and spiritual reasons svk

पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने काय होते? जाणून घ्या खरे कारण….

पिंपळाच्या झाडाचे महत्त्व: हिंदू धर्मात काही झाडे आणि वनस्पतींची पूजा आणि प्रदक्षिणा करण्याचे महत्त्व आहे, ज्यामध्ये पिंपळाचे झाड प्रमुख आहे. हे झाड केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच महत्त्वाचे नाही तर त्यामागे वैज्ञानिक कारणे देखील लपलेली आहेत, ज्यामुळे ते आणखी चमत्कारिक बनते.

June 24, 2025 17:20 IST
Follow Us
  • Oxygen benefits of Peepal tree
    1/12

    भारतीय परंपरेनुसार पिंपळाचे झाड हे केवळ झाड नसून, एक पवित्र स्थान मानले जाते. सनातन धर्मात ते देवत्वाचे प्रतीक आहे. आपले पूर्वज याला पूजनीय मानत आले आहेत. (एक्सप्रेस फोटो)

  • 2/12

    हिंदू धर्मात असे मानले जाते की, ब्रह्मा, विष्णू, शिव आणि शनी देव यांचा वास पिंपळाच्या झाडात असतो. स्कंद पुराणातही याचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे पिंपळाजवळ प्रार्थना करणे हे अत्यंत पुण्यदायक मानले जाते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 3/12

    पिंपळाला प्रदक्षिणा घालणे ही भक्तीची खूण मानली जाते. असे मानले जाते की, जो भक्त मनापासून ही प्रदक्षिणा करतो, त्याच्या जीवनातील अडचणी कमी होतात आणि इच्छा पूर्ण होतात. (एक्सप्रेस फोटो)

  • 4/12

    प्राचीन ऋषी-मुनी सांगतात की, दररोज किंवा आठवड्यातून एकदा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने मन शांत होते, ताणतणाव कमी होतो आणि नकारात्मक विचार दूर जातात. (एक्सप्रेस फोटो)

  • 5/12

    महर्षी शौनक यांनी सांगितले आहे की, सकाळी ब्राह्म मुहूर्तात तीन किंवा सात वेळा पिंपळाला प्रदक्षिणा घातल्यास मानसिक शांती मिळते आणि आध्यात्मिक शुद्धी होते. हा मन आणि आत्म्याच्या संतुलनासाठी एक प्रभावी उपाय आहे. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 6/12

    पिंपळाचे झाड दिवसासोबतच रात्रीही ऑक्सिजन सोडते. त्यामुळे त्याच्या आसपास प्रदक्षिणा घालणे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे श्वास सुधारतो आणि ताजेतवाने झाल्यासारखे वाटते. (एक्सप्रेस फोटो)

  • 7/12

    चरक संहितेनुसार वात, पित्त व कफ या तीन दोषांचे संतुलन आरोग्यासाठी आवश्यक आहे. ‘ॐ नमः शिवाय’चा जप करीत पिंपळाच्या झाडाची परिक्रमा केल्यास हे संतुलन साधले जाते आणि शरीर निरोगी राहते (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 8/12

    ज्योतिषशास्त्रानुसार शनी दोष असलेल्या व्यक्तींनी दर शनिवारी किंवा अमावास्येला सात वेळा पिंपळाला प्रदक्षिणा घालावी. त्यामुळे शनीची कृपा मिळते आणि जीवनातील अडथळे कमी होतात. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 9/12

    ज्योतिषशास्त्रानुसार पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनी देव प्रसन्न होतो. हा उपाय केल्याने जीवनातील अडथळे कमी होतात आणि मानसिक शांतता मिळते. (एक्सप्रेस फोटो)

  • 10/12

    शनिवारी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करून दिवा लावल्यास देवी लक्ष्मीची कृपा मिळते. असे मानले जाते की यामुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि घरात स्थिरता व समृद्धी येते. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

  • 11/12

    ज्योतिषशास्त्रानुसार, नक्षत्राप्रमाणे दिलेल्या दिवशी ठरावीक वेळा प्रदक्षिणा घातल्यास ग्रहदोष दूर होतात. जसे की रविवारी ५, सोमवार ४ व मंगळवारी ८ प्रदक्षिणा – हा मार्ग नशीब उजळवतो, असे मानले जाते. (एक्सप्रेस फोटो)

  • 12/12

    काही जण पिंपळाजवळ भूत-प्रेत असल्याच्या अफवा पसरवतात; पण हे झाड खरे तर आरोग्य आणि पर्यावरणासाठी फार उपयुक्त आहे. म्हणूनच आपल्या पूर्वजांनी त्याला पवित्र मानले आणि पूजा करण्याची परंपरा सुरू केली. (छायाचित्र स्रोत: पेक्सेल्स)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Why we do circumambulation around peepal tree scientific and spiritual reasons svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.