• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. women health menstrual cup for comfort hygiene during periods svk

पाळीच्या काळात स्वच्छता आणि आराम हवाय? ‘हा’ कप देईल दुहेरी सुविधा!

पाळीत महिलांचा मेंस्ट्रुअल कपकडे वाढता कल दिसतोय. हा पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय असल्याने अनेक महिला पारंपरिक सॅनिटरी नॅपकिन्सऐवजी कपचा वापर करू लागल्या आहेत. जाणून घ्या मेंस्ट्रुअल कपचे प्रकार, फायदे आणि योग्य कप कसा निवडावा याविषयी…

June 30, 2025 17:55 IST
Follow Us
  • menstrual cup
    1/8

    आधुनिक काळातील सुरक्षित पर्याय
    सॅनिटरी नॅपकिन आणि टॅम्पॉन्सच्या तुलनेत मेंस्ट्रुअल कप हा आधुनिक महिलांसाठी अधिक स्वच्छ, टिकाऊ व सुरक्षित पर्याय ठरत आहे. अलीकडच्या काळात अनेक महिलांनी कप वापरण्याकडे कल दर्शवला आहे. (छायाचित्र: Freepik)

  • 2/8

    मेंस्ट्रुअल कप म्हणजे नेमकं काय?
    मेंस्ट्रुअल कप हा वैद्यकीय दर्जाचा सॉफ्ट सिलिकॉन, रबर किंवा TPE पासून बनवलेला एक छोटा कप असतो. तो योनीत ठेवल्यावर पाळीचे रक्त गोळा करतो. हा कप स्वच्छ धुऊन, निर्जंतुक करून पुन्हा पुन्हा वापरता येतो. (छायाचित्र: Freepik)

  • 3/8

    पर्यावरणासाठी फायदेशीर
    एकदा खरेदी केलेला मेंस्ट्रुअल कप साधारणपणे ५ ते १० वर्षे टिकतो. त्यामुळे दर महिन्याला सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर कमी झाल्याने प्लास्टिक कचरा टळतो आणि पर्यावरणावरील ताणही कमी होतो. (छायाचित्र: Freepik)

  • 4/8

    आर्थिकदृष्ट्या फायदेशीर
    एका कपची किंमत सुमारे ₹300 ते ₹1000 पर्यंत असते. एकदा घेतल्यावर तो अनेक वर्षे वापरता येतो. त्यामुळे दर महिन्याच्या खर्चात लक्षणीय बचत होते. (छायाचित्र: Freepik)

  • 5/8

    कपचे प्रकार कोणते?
    मेंस्ट्रुअल कप वेगवेगळ्या आकारांमध्ये येतो — Small, Medium व Large. त्याशिवाय काही कप सॉफ्ट (सेन्सेटिव्ह स्किनसाठी), तर काही फर्म (स्नायू मजबूत असणाऱ्यांसाठी) अशा प्रकारांत उपलब्ध असतात. (छायाचित्र: Freepik)

  • 6/8

    योग्य कप कसा निवडावा?
    वय, रक्तस्रावाचे प्रमाण, बाळंतपणाचा इतिहास आणि दैनंदिन हालचाल लक्षात घेऊन, मेंस्ट्रुअल कप निवडावा. सुरुवातीला डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. (छायाचित्र: Freepik)

  • 7/8

    वापरण्याची पद्धत आणि काळजी
    कप वापरण्याआधी आणि नंतर स्वच्छ हातांनी तो हाताळावा. दर महिन्यानंतर तो उकळून निर्जंतुक करावा. योग्य पद्धतीने वापरल्यास हा कप आरोग्यदृष्ट्या सुरक्षित ठरतो. (छायाचित्र: Freepik)

  • 8/8

    लोकांमध्ये अजूनही संकोच
    अनेक महिलांमध्ये अजूनही मेंस्ट्रुअल कपबाबत भीती आणि गैरसमज आहेत. मात्र, त्यांना योग्य माहिती व मार्गदर्शन केल्यास हा कप एक आरोग्यदायी, स्वच्छ व पर्यावरणपूरक पर्याय ठरतो. (छायाचित्र: Freepik)


    (येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Women health menstrual cup for comfort hygiene during periods svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.