-
तरुण व तजेलदार चेहरा कोणाला नको असतो? वय जसजसं वाढतं, तसतसे चेहऱ्यावर सुरकुत्यांनी घर करणं सुरू होतं. पण, जर शस्त्रक्रिया किंवा महागड्या सौंदर्यप्रसाधनांपासून दूर राहून नैसर्गिक उपायाच्या शोधात असाल, तर फेशियल एक्सरसाईज (Facial Exercises) हा एक उत्तम पर्याय आहे. हे व्यायाम कमी वेळात घरबसल्या करता येतात आणि सातत्य ठेवल्यास त्यांचा परिणामही दिसून येतो. (Photo : Freepik)
-
तुमच्या चेहऱ्यालाही इतर शरीरासारखे स्नायू आहेत आणि ते नियमितपणे सक्रिय ठेवल्यास त्वचेला तजेला, घट्टपणा आणि त्यामुळे एकंदरच नैसर्गिक सुंदरता मिळू शकते.
चला तर पाहूया, वयाच्या खुणा लांब ठेवण्यासाठी हे ५ सोपे; पण प्रभावी फेशियल व्यायाम कोणते आहेत : (Photo : Freepik) -
१. चेहऱ्याचा ‘V’ व्यायाम (V Face Yoga)
हा व्यायाम डोळ्यांभोवतीच्या सुरकुत्या, डार्क सर्कल्स आणि पापण्यांच्या झुकण्यावर उपयोगी. दोन्ही हातांचे मधले बोट त्या-त्या भुवईच्या मधोमध ठेवा आणि तर्जनीने बाह्य कोपऱ्यांवर दाब द्या. डोळे अर्धे उघडे ठेवून वर बघा आणि पाच सेकंदे थांबा. हीच कृती ३ ते ५ वेळा पुन्हा करा. (Photo : Freepik) -
२. स्माईल स्मूथर (Smile Smoother)
या व्यायामामुळे गालांची त्वचा घट्ट होते. ओठांद्वारे ‘O’चा आकार करा आणि मग मोठे स्माईल द्या; पण ओठ बंद ठेवून. ही हालचाल सहा वेळा करा आणि शेवटी डोळे बंद करून १० सेकंद गालांना जोरात वर खेचून धरा. (Photo : Freepik) -
३. लव्ह युअर फोरहेड (Forehead Smoother)
कपाळावरच्या सुरकुत्या दूर करण्यासाठी दोन्ही हातांच्या बोटांची टोके कपाळावर ठेवून, त्वचा बाजूला खेचत ‘आउटवर्ड स्ट्रोक’ द्या. ही हालचाल १० वेळा करा. (Photo : Freepik) -
४. गाल फुगवा (Cheek Plumper)
हा व्यायाम गालांची त्वचा घट्ट करतो. तोंड बंद ठेवून, हवा भरून गाल फुगवा आणि ती हवा एका गालातून दुसरीकडे फिरवा. ३० सेकंद ही कृती चालू ठेवा. (Photo : Freepik) -
५. जॉ लाइन डिफायनर (Jawline Toner)
ओठ बंद ठेवून, जबडा वर आणि पुढे आणा. गाल ओढल्यासारखे करा आणि १० सेकंद थांबा. पाच वेळा ही हालचाल करा. त्यामुळे डबल चिन आणि सैल त्वचेला प्रतिबंध करता येतो. (Photo : Freepik) -
महत्त्वाच्या टिप्स:
हे व्यायाम रोज फक्त ५-१० मिनिटे वेळ काढून करा.
स्वच्छ हातांनी आरशासमोर बसून करा.
संयम आणि सातत्य ठेवल्यास नैसर्गिक चमक व घट्टपणा नक्की मिळेल.
सुई नाही, सर्जरी नाही; सौंदर्याची नैसर्गिक वाट! (Photo : Freepik)
नेहमी तरुण दिसण्यासाठी ‘हे’ ५ फेशियल व्यायाम ठरतील फायदेशीर
घरबसल्या करता येणारे हे ५ फेशियल व्यायाम चेहऱ्याची त्वचा घट्ट ठेवतात, सुरकुत्या कमी करतात आणि नैसर्गिक तजेलपणा वाढवतात.
Web Title: These 5 facial exercises to delay aging naturally svk 05