-
हिंदू धर्मात दान देणे हे पुण्यकर्म मानले जाते. दान केल्याने मनाला शांती मिळते आणि स्वाभिमान वाढतो. पण दानाचे काही नियम आहेत. प्रेमानंद महाराजांच्या मते, काही लोकांनी कितीही दान केले तरी त्यांना पुण्य मिळत नाही. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
प्रेमानंद महाराज हे भारतातील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरूंपैकी एक आहेत. त्यांचे प्रवचन ऐकण्यासाठी मोठे सेलिब्रिटी त्यांच्या वृंदावन धाममध्ये येत राहतात. (छायाचित्र: प्रेमानंदजी महाराज/एफबी)
-
प्रेमानंद महाराज लोकांना धर्माच्या मार्गाने जीवन जगण्याचा सल्ला देतात. तसेच, जर एखाद्या व्यक्तीने त्यांच्या सांगितलेल्या गोष्टी आपल्या जीवनात अंमलात आणल्या तर तो प्रत्येक समस्येवर सहज मात करू शकतो, असे ते म्हणतात. (छायाचित्र: प्रेमानंदजी महाराज/एफबी)
-
आजच्या काळात असे बरेच लोक आहेत जे खूप दान करतात. लोक गरजूंना त्यांच्याकडून होईल तेवढी मदत करतात. पण काही लोकांना दान केल्याने काहीही फायदा होत नाही. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
प्रेमानंद महाराजांच्या मते, प्रत्येकाने शिस्तबद्ध आणि नीतिमान जीवन जगले पाहिजे आणि आपले कर्तव्य बजावले पाहिजे. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
जर प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावले, धर्माचे पालन केले आणि देवाचे नाव घेतले तर संपूर्ण समाज आनंदी राहू शकेल. (छायाचित्र: प्रेमानंदजी महाराज/एफबी)
-
पण जे लोक चुकीच्या मार्गाने पैसे कमवतात आणि दान करून त्यांनी पुण्यकर्म केले आहे असे त्यांना वाटते, त्यांचा विचार चुकीचा आहे. कारण अशा लोकांना त्याचा लाभ कधीच मिळत नाही. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
प्रेमानंद महाराज म्हणतात की, कष्टाने मिळवलेले १० रुपयेही दान करून पुण्य मिळवता येते. पण चुकीच्या कर्मांनी मिळवलेले पैसे कधीच कोणाचे भले करत नाहीत. (छायाचित्र: इंडियन एक्सप्रेस)
-
प्रेमानंद महाराजांच्या मते, चुकीच्या मार्गाने कमावलेला पैसा घरात अशांतता निर्माण करतो. घरातील प्रत्येक सदस्य त्रासलेला राहतो. जर तुम्ही योग्य मार्गाने चालत असाल आणि कमी कमवत असाल तरी तुमचे जीवन समृद्ध होत जाते. (छायाचित्र: प्रेमानंदजी महाराज/एफबी) हेही पाहा- हाताच्या तळव्यात खरंच भविष्य दडलेले असते का? हस्तरेषाशास्त्र विज्ञान आहे की फक्त एक मिथक?
तुम्ही दान करता? प्रेमानंद महाराज म्हणतात की ‘अशा’ लोकांच्या पदरी दान करुनही कधीच पुण्य पडत नाही…
सर्व धर्मांमध्ये दानधर्माला खूप विशेष महत्त्व देण्यात आले आहे. हिंदू धर्मानुसार, दानधर्म पुण्य आणतो. परंतु काही लोकांना दानधर्माचे पुण्य कधीच मिळत नाही.
Web Title: Who does not get blessings from donation premanand maharaj spl