-
आलं : शरीरासाठी उपयुक्त नैसर्गिक टॉनिक
आलं हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. कच्चं आलं पचन सुधारतं, मळमळ थांबवतं आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवतं. भाजलेलं आलं सांधेदुखीपासून आराम देतं, साखर नियंत्रित करतं आणि वजन कमी करण्यास मदत करतं. -
भाजलेलं आलं : सांधेदुखी आणि सूज यावर प्रभावी
आल्याला ‘पॉवरहाऊस’ म्हटलं जातं. भाजलेलं आलं संधिवात आणि शरीरातील वेदनांवर फायदेशीर ठरतं. त्यातील दाहक-विरोधी गुणधर्म शरीराचा कडकपणा कमी करतात आणि सांधेदुखीपासून दिलासा देतात. -
आजारांपासून बचावासाठी उपयोगी
आल्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि दाहकविरोधी गुणधर्म आहेत. त्यामुळे सर्दी, घशाची खवखव, थकवा यांसारख्या त्रासांपासून बचाव होतो आणि शरीराला आजारांशी लढण्याची ताकद मिळते. -
साखर नियंत्रण आणि हृदय आरोग्य सुधारते
आले इन्सुलिनचं कार्य सुधारून रक्तातील साखर स्थिर ठेवतं. भाजलेलं आलं कोलेस्ट्रॉल कमी करतं, रक्ताभिसरण सुरळीत करतं आणि त्यामुळे हृदय निरोगी राहायला मदत होते. -
मन शांत ठेवणं आणि पचन सुधारणं
भाजलेलं आलं तणाव आणि चिंता कमी करतं. मेंदूचं कार्य सुधारून मनाची स्थिती संतुलित राहते. जेवणानंतर घेतल्यास गॅस, आम्लता, पोटदुखी यांवर आराम मिळतो आणि अन्नाचं पचन चांगलं होतं. -
योग्य प्रमाण आणि काळजीपूर्वक सेवन आवश्यक
भाजलेलं आले चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करतं. मात्र, गर्भवती महिलांनी आणि पित्ताचे प्रमाण जास्त असलेल्या व्यक्तींनी ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं. रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात घेतल्यास पोटात जळजळ होऊ शकते.
पावसाळ्यात भाजलेलं आले खाल्ल्याने मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे?
आलं हे कच्चं असो किंवा भाजलेलं, शरीरासाठी ते अनेक प्रकारे फायदेशीर ठरतं. पचन सुधारण्यापासून ते तणाव कमी करण्यापर्यंत, याचे औषधी गुणधर्म आरोग्यासाठी वरदान ठरतात. मात्र, काहींनी ते डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यावं.
Web Title: Food roasted ginger benefits during monsoon sc ieghd import