-
IFoods To Avoid For Acne : : बॉडीक्राफ्ट क्लिनिक्सच्या वैद्यकीय संचालक आणि संस्थापक डॉ. मिक्की सिंग यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सुंदर आणि नितळ त्वचेसाठी टाळावे अशा पदार्थांची यादी दिली आहे. (स्रोत: फ्रीपिक)
-
डॉ. मिक्की सिंग यांच्या मते, “दुग्धजन्य पदार्थ, विशेषतः स्किम मिल्क, मुरुमांशी संबधीत आहेत कारण हार्मोन्स आणि वाढीचे घटक दाहकता आणि तेल उत्पादनास कारणीभूत ठरू शकतात.” (स्रोत: फ्रीपिक)
-
मोठ्या प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने इन्सुलिनची पातळी वाढते, ज्यामुळे मुरुमे वाढू शकतात आणि तेलाचे उत्पादन वाढून आणि छिद्रे बंद होऊन दाहकता निर्माण होऊ शकते, असे त्वचारोगतज्ज्ञ स्पष्ट करतात. (स्रोत: फ्रीपिक)
-
फास्ट फूडमध्ये बहुतेकदा रिफाइंड कार्ब्स, अस्वास्थ्यकर फॅट्स आणि अॅडिटीव्हजचे मिश्रण असते. ते दाहकता आणि ऑक्सिडेटिव्ह ताण वाढवू शकतात – जे दोन्ही त्वचेच्या स्पष्टतेवर आणि वृद्धत्वावर परिणाम करतात, असे डॉ. सिंग पुढे म्हणतात. (स्रोत: फ्रीपिक)
-
पांढरा ब्रेड आणि रिफाइंड कार्ब्स हे उच्च-ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्न आहेत जे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढवतात. यामुळे सेबम उत्पादन वाढते आणि अँड्रोजन हार्मोन्स उत्तेजित होतात, ज्यामुळे मुरुमे होतात. (स्रोत: फ्रीपिक)
-
प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये नायट्रेट्स, सोडियम आणि प्रिझर्वेटिव्ह असतात जे जळजळ आणि कोलेजन बिघाड होण्यास हातभार लावू शकतात, ज्यामुळे त्वचेची कडकपणा आणि स्पष्टता प्रभावित होते. (स्रोत: फ्रीपिक)
-
चॉकलेट खाल्ल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते का यावर त्वचारोगतज्ज्ञ सांगतात की,”या दाव्यावर वाद असले तरी काही अभ्यास असे सूचित करतात की, चॉकलेट – विशेषतः मिल्क चॉकलेटमधील साखर आणि दुग्धजन्य पदार्थ – काही व्यक्तींमध्ये मुरुम होण्याचे प्रमाण वाढवू शकतात.” (स्रोत: फ्रीपिक)
-
अल्कोहोल पिण्यामुळे रक्तवाहिन्या रुंद होतात आणि त्वचेचे डिहायड्रेशन होते, त्यामुळे लालसरपणा आणि सूज आणखी वाढू शकते. याव्यतिरिक्त, ते अखेरीस यकृताच्या कार्याला हानी पोहोचवू शकते, ज्यामुळे त्वचेच्या डिटॉक्सिफिकेशनवर परिणाम होतो, असे ती सांगते. (स्रोत: फ्रीपिक)
-
“काहींसाठी, सोयामधील फायटोएस्ट्रोजेन हार्मोनल संतुलन बिघडू शकतात आणि हार्मोनल मुरुमे वाढवू शकतात, विशेषतः जबड्याच्या आणि हनुवटीभोवती,” डॉ. सिंग म्हणतात. (स्रोत: फ्रीपिक)
सुंदर अन् नितळ त्वचा हवी आहे का? हे ९ पदार्थ खाणे टाळा, तज्ज्ञांनी दिला सल्ला
Foods To Avoid For Acne : सुंदर अन् नितळ त्वचा हवी असल्यास त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितलेले हे ९ सामान्य पदार्थ मुरुमांना कारणीभूत ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन टाळा.
Web Title: Want clear skin avoid these 9 foods recommended by dermatologist 9954583 iehd import snk