-
ज्योतिषशास्त्रानुसार जुलैमध्ये सूर्य, बुध यांसारख्या काही महत्त्वपूर्ण ग्रहांचे राशी परिवर्तन झाले आहे. ६ जुलै रोजी देवशयनी एकादशी (आषाढी एकादशी) साजरी करण्यात आली. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये जातात. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते. या काळात शुभ कार्य करणे वर्ज्य मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
तसेच कार्तिक महिन्यातील देवउठनी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेतून जागे होतात. कार्तिक एकादशीनंतर शुभ कार्यांना सुरुवात होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
यंदा १ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी साजरी केली जाईल. ६ जुलै ते १ नोव्हेंबरपर्यंतचा हा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास असेल. या काळात त्या राशीच्या व्यक्तींवर श्री विष्णूचा आशीर्वाद असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
चातुर्मासाचा काळ मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशीच्या व्यक्तींनादेखील चातुर्मासाचा काळ खूप फायदेशीर ठरेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
चार्तुमासाचा काळ मीन राशीच्या व्यक्तींसाठीदेखील खूप अनुकूल असेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
१ नोव्हेंबरपर्यंत बक्कळ पैसा कमावणार, ‘या’ तीन राशींच्या बँक बॅलन्समध्ये घसघशीत वाढ होणार
Chaturmas 2025: यंदा १ नोव्हेंबर रोजी कार्तिक एकादशी साजरी केली जाईल. ६ जुलै ते १ नोव्हेंबरपर्यंतचा हा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप खास असेल.
Web Title: Chaturmas 25 create shubh yog for three zodic get wealthy life sap