-
केस आणि त्वचेसाठी आवळ्याचे जबरदस्त फायदे
आवळा हे एक औषधी फळ आहे. त्यात व्हिटॅमिन सी, बी, लोह व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. रोज थोडा आवळा खाल्ल्याने संपूर्ण आरोग्य सुधारते. रात्री ११ वाजण्यापूर्वी खाल्ल्यास केस मजबूत होतात आणि सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्वचा तजेलदार होते. केस आणि त्वचेची योग्य काळजी घेण्यासाठी आवळा उपयोगी ठरतो. -
मेंदी आणि आवळ्याने केसांना नैसर्गिक पोषण
१ चमचा वाळलेल्या आवळ्याच्या पानांमध्ये ३ चमचे मेंदी पावडर मिसळा. त्यात ४ चमचे कोमट पाणी घालून पेस्ट तयार करा. हे मिश्रण टाळू आणि केसांवर लावा. एक तासाने केस धुवा. हा उपाय महिन्यातून एकदा केल्याने केसांना चांगले पोषण मिळते. -
मेथी आणि आवळा हे केसगळतीवर उपाय
२ चमचे आवळा पावडरमध्ये २ चमचे मेथी पावडर आणि ५ चमचे कोमट पाणी मिसळा. ही पेस्ट टाळूवर लावून २० मिनिटांनी धुवा. आठवड्यातून दोन वेळा वापरल्यास केस गळणे कमी होऊन केस मुळांपासून मजबूत होतात. -
गोड कडुलिंब आणि आवळ्याचे केसांसाठी तेल
नारळाचे तेल गरम करा. त्यात अर्धा कप कढीपत्ता पावडर आणि अर्धा कप आवळा पावडर घाला. तेलाचा तपकिरी रंग झाल्यावर गॅस बंद करा आणि तेल गाळून ठेवा. थोडे गरम तेल टाळूवर लावून १५ मिनिटे मालिश करा. अर्ध्या तासाने केस धुवा. त्यामुळे केस मुलायम, दाट व चमकदार होतात. -
पपई-आवळा फेशियल त्वचेसाठी उत्तम
२ चमचे आवळा रस आणि २ चमचे मॅश केलेली पपई एकत्र करून चेहऱ्यावर लावा. १५ मिनिटांनी धुवा. त्वचेचा रंग उजळतो आणि चेहरा मऊ व ताजातवाना दिसतो. आठवड्यातून दोन वेळा लावल्यास उत्तम परिणाम दिसून येतात.
आवळ्यामध्ये लपलंय सौंदर्याचं गुपित! केस आणि त्वचेसाठी खूपच फायदेशीर
आवळा हे एक असं फळ आहे, ज्यामध्ये सौंदर्य टिकवून ठेवण्याची नैसर्गिक ताकद आहे. त्यात भरपूर व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक असतात, जे केस मजबूत करतात आणि त्वचा उजळवतात. रोज थोडा आवळा खाल्ला किंवा योग्य प्रकारे वापरला, तर केसगळती, कोरडेपणा, त्वचेवरचा थकवा यांवर प्रभावी परिणाम दिसतो.
Web Title: Amla ayurvedic remedies glowing skin strong hair natural beauty care svk 05