• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • उद्धव ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. follow these eight easy makeup fixes to correct mistakes without removing everything svk

चुकलेला मेकअप आता पटकन करा ओके; ‘या’ टिप्स फॉलो करा

मेकअप करताना थोडीशी चूक झाली की, बऱ्याच जणी लगेच निराश होतात. “आता पुन्हा सगळं धुऊन टाकावं लागेल,” असं वाटायला लागतं. पण खरं सांगायचं झालं, तर अशा वेळी काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्या, तर काम सोपं होतं. जाणून घ्या अशाच ८ सोप्या आणि प्रभावी ट्रिक्स

July 13, 2025 16:03 IST
Follow Us
  •  easy makeup fixes to correct mistakes
    1/8

    चेहरा खूप केकी दिसतोय? (फाउंडेशन जड झालंय?) कधी कधी फाउंडेशन थोडं जास्त लागतं आणि चेहरा ‘केकी’ दिसतो. अशा वेळी फेशियल मिस्ट किंवा थोडंसं पाणी चेहऱ्यावर फवारून, मेकअप स्पंजनं टॅप करा. त्वचेला ओलावा मिळतो आणि मेकअप नैसर्गिक दिसतो. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 2/8

    ब्लश जरा जास्तच गडद लावलाय? ब्लश खूप गडद झाला, तर चेहरा नकळत खोटा किंवा जास्त मेकअप केलेला वाटू शकतो. असं झाल्यास एक स्वच्छ ब्रश घ्या आणि त्या भागावर हळुवार फिरवा. नाही तर थोडी ट्रान्सलूसेंट पावडर लावून रंग सौम्य करा. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 3/8

    आयलाइनर वाकडा गेला? लिक्विड किंवा जेल आयलाइनर लावताना थोडा हात हलला की, रेषा वाकडी होते. मग अशा वेळी लगेच पॅनिक होण्याऐवजी, कॉटन बडमध्ये मेकअप रिमूव्हर लावा आणि त्या रेषेचा शेवट हलकासा पुसा. मग त्यावरून पुन्हा सरळ रेषा आखून घ्या. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 4/8

    मस्कारा डोळ्याखाली लागला? अनेकदा मस्कारा लावताना वर पाहताना तो डोळ्याखाली लागतो. मग अशा वेळी तो लगेच पुसू नका. तो सुकू द्या. मग एक स्पुली ब्रश (मस्काराचा जुना ब्रश) घ्या आणि त्यानं तो हलक्या हातानं झटकून टाका. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 5/8

    मस्काऱ्याने केस एकत्र चिकटलेत जास्त मस्कारा लावला किंवा ओलसर ब्रश वापरला, की केस एकत्र चिकटतात. असं झाल्यास, एक स्वच्छ लॅश-कॉम्ब (लॅश विंग) वापरा आणि वरून खाली केस सुटे करा. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 6/8

    ओठ किंवा गाल खूप गडद रंगले? लिपस्टिक किंवा ब्लश थोडा जास्त झाला, तर स्पंजने हळुवार टॅप करून, ती जागा सौम्य करा. एकाच भागावर जास्त लक्ष न देता, इतर भागांतही थोडा फाउंडेशन टच द्या म्हणजे लूक बॅलन्स होतो. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 7/8

    आयशॅडो किंवा ग्लिटर चेहऱ्यावर पडतंय? कधी कधी डोळ्यांवर आयशॅडो लावताना थोडी पावडर खाली पडते. ती साफ करताना फाउंडेशनही खराब होऊ शकते. असं झाल्यास, साफ ब्रशने ती झटकून टाका किंवा क्लीन टेपने हळूच तो भाग उचला. (फोटो सौजन्य : FreePik)

  • 8/8

    भुवया चुकल्या किंवा गडद झाल्या? भुवया भरताना कधी काळजी न घेतल्यास त्या खूप गडद किंवा कडक दिसू शकतात. असं वाटल्यास, स्पुलीने ब्रश करून, त्या थोड्या हलक्या करा. हवं असल्यास थोडं कन्सीलर लावून एज नीट करा. (फोटो सौजन्य : FreePik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Follow these eight easy makeup fixes to correct mistakes without removing everything svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.