• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. curd dahi good or bad in monsoon health benefits and side effects svk

पावसाळ्यात दही खाण्याआधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या

पावसाळ्यात पचन मंदावल्यामुळे दही खाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीनं खाल्ल्यास दही आरोग्यास फायदेशीर ठरू शकतं, अन्यथा त्रासदायकही ठरू शकतं.

July 14, 2025 17:35 IST
Follow Us
  • Should we eat curd during monsoon or not?
    1/6

    पावसाळ्यात आपली पचनक्रिया थोडी मंदावते, यामुळे अपचन, गॅस किंवा पोटफुगीसारख्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे पावसाळ्यात काही अन्नपदार्थ खाण्यापूर्वी थोडी काळजी घेणं गरजेचं आहे. विशेषतः दही खाण्याबाबत सतर्कता आवश्यक आहे.

  • 2/6

    पावसाळ्यात दही खाण्यापूर्वी ही माहिती आवश्यक
    दही हे पचनासाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त मानले जाते. यामध्ये प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि प्रथिने असतात. पण, पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता जास्त असल्यामुळे दही खाण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.

  • 3/6

    सर्दी-खोकल्यावर दही खाल्लं तर होऊ शकतो त्रास
    जर तुम्हाला सर्दी, खोकला किंवा घसा खवखवत असेल तर अशावेळी दही टाळावं, यामुळे प्रकृती अधिक बिघडू शकते. तसेच दही खाल्ल्याने शरीरात लाळ वाढू शकते आणि थंडी वाढू शकते.

  • 4/6

    आयुर्वेद काय सांगतो?
    आयुर्वेदानुसार, पावसाळ्यात थंड अन्न खाल्ल्याने पचनशक्ती कमजोर होते. त्यामुळे अपचन, गॅस किंवा पोटफुगीसारखे त्रास होऊ शकतात. दही खायचंच असेल तर त्यात काळी मिरी किंवा भाजलेलं जिरं घालून खावं, जेणेकरून पचन सुलभ होईल.

  • 5/6

    रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याचा धोका
    पावसाळ्यात दही खाल्ल्याने काहींच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. लाळ गळण्यासारखी समस्या वाढते, ज्यामुळे पोट खराब होण्याचा धोका असतो. तसेच हंगामी आजार आणि ॲलर्जी याही अधिक प्रमाणात होतात.

  • 6/6

    दही खाण्याची सवय असेल तर…
    दही खाणं आवडत असेल, तर पावसाळ्यात घरी बनवलेलं आणि ताजं दहीच खावं. बाजारात मिळणारं किंवा आंबट झालेलं दही टाळावं. आंबट दही खाल्ल्याने पोटात जळजळ, अतिसार आणि बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Curd dahi good or bad in monsoon health benefits and side effects svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.