-
थायरॉईड ही मानेतील एक लहान ग्रंथी शरीरातील चयापचय, ऊर्जा आणि संप्रेरकांना नियंत्रित करते. हायपोथायरॉइडीझम म्हणजेच थायरॉईड संप्रेरकांची कमतरता झाल्यास योग्य औषधांसोबत संतुलित आहार घ्यावा लागतो. खाली अशाच काही उपयुक्त आहार घटकांची माहिती दिली आहे:
-
झिंकयुक्त आहार उपयुक्त
थकवा, केसगळती व अशक्तपणा टाळण्यासाठी झिंकयुक्त आहार उपयुक्त ठरतो. बीन्स, मसूर, काजू, चिकन आणि समुद्री अन्नामध्ये झिंक भरपूर प्रमाणात असतो. -
अँटिऑक्सिडंटयुक्त फळे व भाज्या :
ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे थायरॉईड ग्रंथीवर ताण येतो. रंगीत फळे व भाज्यांमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराचे संरक्षण करतात आणि थायरॉईडच्या कार्यास मदत करतात. -
आयोडीनयुक्त अन्न :
थायरॉईड संप्रेरक तयार होण्यासाठी आयोडीन आवश्यक असते. हायपोथायरॉइडीझम असलेल्या रुग्णांनी
आहारात आयोडीनयुक्त मीठ, मासे, अंडी व दूध यांचा समावेश करावा. मात्र, हायपरथायरॉइडीझममध्ये हे टाळावे त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. -
व्हिटॅमिन डीचे स्रोत :
थायरॉईडच्या कार्यक्षमतेसाठी व्हिटॅमिन डीही तितकेच महत्त्वाचे आहे. सॅल्मन, दूध, संत्र्याचा रस व मशरूम हे त्याचे चांगले स्रोत आहेत. तसेच सकाळचा सूर्यप्रकाशदेखील उत्तम नैसर्गिक स्रोत आहे. -
आहार आणि औषध यांचा समतोल :
फक्त औषधांवर नाही, तर आहारावरही लक्ष द्यावे. योग्य पोषण मिळाल्यास थायरॉईडचा ताण कमी होतो आणि शरीराची ऊर्जा टिकते. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आहारात बदल करावेत. -
फायबर आणि सेलेनियमयुक्त अन्नपदार्थांचे सेवन
थायरॉईडमुळे अनेक रुग्णांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. त्यासाठी फायबरयुक्त पदार्थ जसे की फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि शेंगा पचन सुधारण्यास मदत करतात. तसेच सेलेनियम थायरॉईड संप्रेरकांचे रूपांतर योग्यरीत्या होण्यासाठी आवश्यक असते. सूर्यफुलाच्या बिया, मशरूम, चिकन व अंडी यामध्ये सेलेनियम मुबलक प्रमाणात असते. -
ग्लुटेनमुक्त आहार फायदेशीर
फुलकोबी, ब्रोकोली, सोया उत्पादने व गोड बटाटे यामध्ये गॉइट्रोजेन असते, जे कच्चे खाल्ल्यास थायरॉईडच्या कार्यात अडथळा येऊ शकतो. त्यामुळे हायपोथायरॉइडीझम असलेल्या रुग्णांनी हे पदार्थ शिजवून मर्यादित प्रमाणात खाणे योग्य ठरते. काही रुग्ण विशेषतः हाशिमोटो आजार असलेले ग्लुटेनच्या बाबतीत संवेदनशील असतात. अशा वेळी त्यांच्यासाठी ग्लुटेनमुक्त आहार फायदेशीर ठरतो. -
प्रक्रियायुक्त पदार्थ आणि आयोडीनवर मर्यादा
प्रक्रिया केलेले अन्न, साखर, तळलेले पदार्थ, कॅफिन व अल्कोहोल यांमुळे शरीरात सूज आणि हार्मोनल असंतुलन निर्माण होऊ शकते. हे पदार्थ थायरॉईड औषधांच्या परिणामावरही परिणाम करू शकतात. तसेच, हायपरथायरॉइडीझम असलेल्या रुग्णांनी आयोडीनयुक्त अन्नाचे सेवन कमी ठेवावे. कारण- जास्त प्रमाणातील आयोडीन त्यांची स्थिती बिघडवू शकते.
थायरॉईड रुग्णांनी चुकूनही खाऊ नका ‘हे’ अन्नपदार्थ
थायरॉईडच्या कार्यात अडथळा येताना आहाराचे योग्य नियोजन अत्यंत गरजेचे असते. झिंक, आयोडीन, सेलेनियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थ थायरॉईडसाठी उपयुक्त ठरतात; तर प्रक्रिया केलेले अन्न, कच्च्या गॉइट्रोजेन भाज्या आणि जास्त आयोडीनयुक्त पदार्थ टाळावेत. डॉक्टरांचा सल्ला घेऊन संतुलित आहार ठेवा.
Web Title: These foods thyroid patients should never eat and must strictly avoid for better health svk 05