-
चेहऱ्याची काळजी का महत्त्वाची?
आपल्या सर्वांना सुंदर आणि तेजस्वी दिसायला आवडतं. त्यामुळे चेहऱ्याची योग्य निगा राखणं आवश्यक ठरतं. टॅनिंग आणि मृत त्वचा काढण्यासाठी आपण फेस स्क्रब वापरतो; पण योग्य पद्धतीनं स्क्रब न केल्यास त्वचेला हानी पोहोचू शकते. तुम्हाला हे माहीत होतं का? -
स्क्रब योग्य पद्धतीनं न केल्यास काय होऊ शकतं?
जर तुम्ही चेहरा चुकीच्या पद्धतीनं स्क्रब करीत असाल, तर त्वचेवर खरखरीतपणा, रुक्षता किंवा सूज येऊ शकते. त्यामुळे स्क्रब करताना काही सोप्या; पण आवश्यक स्टेप्सचं अनुसरण करणं खूप महत्त्वाचं आहे. -
चेहरा स्क्रब करण्यापूर्वी काय कराल?
सर्वप्रथम चेहरा स्वच्छ धुऊन घ्या, जेणेकरून चेहऱ्यावरील धूळ, घाण व तेलकटपणा निघून जाईल. त्यानंतर हलक्या हातांनी स्क्रब लावून, मसाज करा. त्यामुळे त्वचेतील मृत पेशी निघून जातील आणि त्वचा नितळ व तजेलदार दिसेल. -
स्क्रब केल्यानंतर काय कराल?
पाण्यानं चेहरा धुऊन घ्या आणि टॉवेलद्वारे हलक्या हातांनी पुसा. नंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. कोरडेपणा टाळण्यासाठी फेस सीरम वापरणंही उत्तम ठरतं. -
स्क्रब करताना लक्षात ठेवा ‘ही’ गोष्ट
स्क्रब करताना हातांचा जास्त दाब पडू देऊ नका. स्क्रबमधील बारीक कण त्वचेला इजा करू शकतात, म्हणून हलक्या हातांनी मसाज करा. -
डोळ्यांपासून अंतर ठेवा
स्क्रब करताना डोळ्यांपासून अंतर ठेवणं गरजेचं आहे. नाकाच्या बाजूला स्क्रब लावणं महत्त्वाचं, कारण- तेथील छिद्रांमध्ये मळ साचण्याची शक्यता जास्त असते.
(हेही पाहा:संगणकावर काम केल्याने पाठदुखी होते का? ‘हे’; आसन ठरेल फायदेशीर)
स्क्रबिंग करताना टाळा ‘या’ चुका; सुंदर त्वचेसाठी अनुसरण करा योग्य स्टेप्सचे
स्क्रब करताना लहान चुकादेखील त्वचेला हानी पोहोचवू शकतात. चेहऱ्याची योग्य काळजी घेण्यासाठी स्क्रबची योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.
Web Title: How to use face scrub properly and avoid common mistakes for glowing skin care tips svk 05