-
तूप हे भारतीय जेवणातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहे. सकाळी रिकाम्या पोटी तूप खाणे अत्यंत लाभदायक मानले जाते.
-
योगगुरूंचा सल्ला:
योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, रिकाम्या पोटी तूप खाल्ल्याने शरीर आणि मन दोन्ही मजबूत होतात. त्यांनी यूट्यूबवर याबाबत खास व्हिडीओ शेअर केला आहे. -
मेंदू आणि स्मरणशक्ती:
तुपात फॅटी अॅसिड्स असतात, जे मेंदूच्या न्यूरॉन्सना बळकटी देतात. त्याचे नियमित सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि मेंदूशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. -
डोळे, त्वचा आणि हाडे:
तुपातील व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. त्वचेला चमक देतो, कोरडेपणा दूर करतो आणि हाडे व स्नायू मजबूत करतो. -
सांधे आणि रोगप्रतिकारक शक्ती:
तूप सांधेदुखी कमी करते आणि शरीराला रोगांशी लढण्याची ताकद देते. -
आयुर्वेदानुसार फायदे:
तूप तिन्ही दोष वात, पित्त आणि कफ संतुलित करते. पचनसंस्थेला मदत करते आणि बद्धकोष्ठता दूर करते. -
सकाळी तूप खाण्याची पद्धत:
सकाळी २ चमचे शुद्ध गायीचे तूप थोडे कोमट करून घ्या, त्यात चिमूटभर मीठ टाका आणि नंतर २ ग्लास कोमट पाणी प्या. -
तूप सेवन करताना खबरदारी:
तूप नेहमी शुद्ध व सेंद्रिय असावे. जास्त प्रमाणात घेतल्यास वजन वाढू शकते. मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल किंवा यकृताचे आजार असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्याचे सेवन करावे.
सकाळी रिकाम्या पोटी तूप खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? बाबा रामदेव सांगतात, शरीरावर काय होईल परिणाम…
तूप फक्त जेवणाची चवच वाढवत नाही, तर मेंदू, डोळे, त्वचा, हाडे आणि सांधेदुखीसाठीही खूप फायदेशीर आहे.
Web Title: Eating ghee on an empty stomach benefits baba ramdev reveals surprising health tips svk 05