-
गायीच्या दुधातील प्रथिनांमुळे टाइप १ मधुमेह होण्याची शक्यता वाढते का, विशेषतः अगदी लहान मुलांमध्ये? चिंतेची बाब अशी आहे की काही लोकांमध्ये, शरीराची संरक्षण प्रणाली (रोगप्रतिकारक शक्ती) ही गायीच्या दुधातील काही प्रथिनांवर प्रतिक्रिया देऊ शकते आणि चुकून शरीरातील इन्सुलिन बनवणाऱ्या पेशींवर हल्ला करू शकते. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
“पण यावरील संशोधन हे अद्याप स्पष्ट नाही, काही अभ्यासांनुसार यामध्ये काहीतरी संबंध असू शकतो तर इतर काही हे यासाठी अगदी कमी पुरावे असल्याचे दर्शवतात,” असे ठाणे येथील KIMS हॉस्पिटल्सच्या मुख्य आहारतज्ञ, डॉ. गुलनाज शेख यांनी सांगितले.
-
गायीच्या दुधातील प्रथिनांचा शरीरावर कसा परिणाम होऊ शकतो?
गाईच्या दुधात दोन मुख्य प्रथिने असतात; केसीन (casein) आणि व्हे (whey). “हे बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आहेत. परंतु ज्यांच्यामध्ये काही विशिष्ट अनुवांशिक वैशिष्ट्ये किंवा संवेदनशील रोगप्रतिकारक प्रणाली आहेत अशा काहींसाठी ही प्रथिने रोगप्रतिकारक प्रतिक्रिया (immune reaction) तयार करू शकतात,” असे शेख यांनी सांगितले . (छायाचित्र: पिक्साबे) -
टाइप १ मधुमेहात, रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील इन्सुलिन बनवणाऱ्या पेशींवर हल्ला करते आणि त्यांना नष्ट करते. “अनेक गोष्टी यास कारणीभूत ठरू शकतात, जसे की कौटुंबिक इतिहास, वातावरण किंवा विषाणूजन्य संसर्ग. काही तज्ञांचे मत आहे की बाळांना खूप लवकर गाईच्या दुधातील प्रथिने देणे हे काही मोजक्या मुलांसाठी ट्रिगर असू शकते,” असे शेख यांनी सांगितले.. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
हे लक्षात ठेवले पाहिजे? ज्या बाळांना पोट आणि रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित होण्यापूर्वी गाईचे दूध किंवा गाईच्या दुधाच्या प्रथिने असलेला फॉर्म्युला दिला जातो त्यांच्यासाठी ही संभाव्य गोष्ट लक्षत ठेवणे महत्त्वाचे आहे. (छायाचित्र: पिक्साबे)
-
“म्हणूनच पहिल्या सहा महिन्यांत स्तनपानाची शिफारस केली जाते, कारण ते काही आरोग्य धोके कमी करण्यास आणि मजबूत प्रतिकारशक्ती निर्माण करण्यास मदत करू शकते. आधीच दुधाची ऍलर्जी किंवा इंटॉलरन्स नसेल तर मोठी मुले आणि प्रौढांसाठी, कमी प्रमाणात दूध पिल्याने ही समस्या उद्भवण्याची शक्यता नसते,” असे शेख यांनी सांगितले. . (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
किती सेवन प्रमाणाच्या बाहेर किंवा धोकादायक ठरू शकते? गाईच्या दुधाच्या प्रथिनांबाबत किती घेतले म्हणजे धोका होईल अशी काही मर्यादा नाही. “ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते. निरोगी प्रौढांसाठी, दिवसातून एक किंवा दोन ग्लास दूध (किंवा तेवढेट दही किंवा चीज) सहसा ठीक असते,” असे शेख यांनी सांगितले. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
जास्त दूध पिल्याने, जसे की दररोज मोठे ग्लास भरून दूध पिल्याने तुम्हाला मधुमेह होणार नाही, परंतु त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज, पोटात अस्वस्थता किंवा आहारात जास्त प्रमाणात संतृप्त चरबी यासारख्या इतर समस्या उद्भवू शकतात. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
गाईचे दूध अजूनही बहुतेक मुलांसाठी आणि प्रौढांसाठी एक आरोग्यदायी अन्न आहे, जे कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वे देते. परंतु कोणत्याही अन्नाप्रमाणे, ते देखील मर्यादित प्रमाणात घेतले पाहिजे. पालकांनी त्यांच्या मुलांना दूध कधी आणि कसे मिळते यावर देखील लक्ष ठेवले पाहिजे. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
गाईच्या दुधातील प्रथिनांमुळे टाइप १ मधुमेह होऊ शकतो का? आहारतज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती
टाइप १ मधुमेहात, रोगप्रतिकारक शक्ती स्वादुपिंडातील इन्सुलिन बनवणाऱ्या पेशींवर हल्ला करते आणि त्यांचा नाश करते.
Web Title: Cow milk protein type 1 diabetes dietitian expert 10184857 iehd import rak