-
हिंदू पंचांगानुसार, २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सवाची सुरूवात होणार असून ७ सप्टेंबर हा गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या दिवशी महाराष्ट्रामध्ये घरोघरी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना केली जाते.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
यंदा गणेशोत्सवाच्या काळात म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी बुद्धीचा कारक ग्रह बुध देखील राशी परिवर्तन करणार आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधाचे हे राशी परिवर्तन काही राशींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
तूळ राशीच्या व्यक्तींना बुधाचे गोचर खूप सकारात्मक ठरेल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
बुधाचे गोचर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी बुधाचे गोचर भाग्यशाली सिद्ध होईल. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासह दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
अचानक धनलाभ होणार! बाप्पाच्या कृपेने ‘या’ तीन राशींचे आयुष्य बदलणार
Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेशोत्सवाच्या काळात म्हणजेच २९ ऑगस्ट रोजी बुद्धीचा कारक ग्रह बुध देखील राशी परिवर्तन करणार आहे.
Web Title: From ganesh chaturthi 25 these three zodic get new job pramotion sap