Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. ancient indian wellness secrets ayurvedic yoga traditional therapies health tips svk

भारतातील ‘ही’ प्राचीन आरोग्य रहस्ये, जी तुम्हाला माहीत असणे आवश्यक

योग व आयुर्वेदापुरतेच नाही, तर भारताच्या प्राचीन आरोग्य परंपरेत अशा अनोख्या पद्धती आहेत, ज्या शरीर-मनाचे संतुलन साधून गहन उपचार व पुनरुज्जीवन घडवून आणतात.

August 28, 2025 17:28 IST
Follow Us
  • wellness
    1/6

    तणाव कमी करणारी शिरोधारा थेरपी
    कपाळावर उबदार औषधी तेलाचा सतत प्रवाह… हीच शिरोधारा थेरपी! हा प्राचीन आयुर्वेदिक उपचार मज्जासंस्थेला शांत करतो, चिंता दूर करतो व झोपेची गुणवत्ता सुधारतो. मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी याला आजही प्रचंड मागणी आहे.

  • 2/6

    पंचकर्म : शरीराची पाच-पदरी शुद्धी
    आयुर्वेदातील पंचकर्म ही केवळ थेरपी नाही, तर शरीरशुद्धीची प्रक्रिया आहे. उलटीद्वारे शुद्धीकरण, एनिमा, या उपचारपद्धतींच्या संगमाद्वारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात

  • 3/6

    ऊर्जा जागवणारी मर्म थेरपी
    १०७ महत्त्वाच्या ऊर्जा केंद्रांवर दिलेला हलका दाब हाच मर्म थेरपीचा गाभा. चिनी पद्धतीतील अ‍ॅक्युप्रेशरसारखीच ही थेरपी ऊर्जा वाहिन्या मोकळ्या करते, रक्ताभिसरण सुधारते आणि शारीरिक-मानसिक दोन्ही पातळ्यांवर उपचारांना चालना देते. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत मर्म थेरपीला विशेष महत्त्व मिळत आहे.

  • 4/6

    नेती क्रिया : श्वसनशुद्धीचा यौगिक मार्ग
    योगातील शतकर्म पद्धतीतील नेती क्रिया ही नाकाची शुद्धी आहे. नेती करण्याच्या भांड्यातील कोमट खारट पाण्याने नाकपुड्या धुतल्या गेल्याने श्वसन सुधारते, विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि एकाग्रता वाढते. प्राचीन योग्यांसारखे आज अनेक जण श्वसन आरोग्यासाठी हा उपाय दररोज वापरत आहेत.

  • 5/6

    कटी बस्ती : पाठीसाठी खास उपचार
    पाठीच्या खालच्या भागावर कणकेचा डबा ठेवून, त्यात औषधी तेल भरले जाते… हाच उपचार म्हणजे ‘कटी बस्ती’. या उपचारामुळे तेल ऊतींमध्ये खोलवर जाऊन वेदना, कडकपणा व अस्वस्थता कमी होते. पाठीला बळकटपणा देऊन गतिशीलता टिकवून ठेवण्यास हा उपचार आजही उपयुक्त मानला जातो.

  • 6/6

    गंडुषा : चेहऱ्याच्या आरोग्याचा गुपित मंत्र
    तोंड पूर्णपणे औषधी तेल किंवा काढ्याने भरून काही वेळ स्थिर ठेवणे  म्हणजे गंडुषा विधी. आयुर्वेदानुसार या विधीमुळे विषाक्त पदार्थ बाहेर पडतात, चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात, सुरकुत्या कमी होतात आणि इंद्रियांची तीव्रता वाढते. दैनंदिन जीवनात करायला सोपा असलेला हा उपाय चेहऱ्याला नवचैतन्य देतो.

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Ancient indian wellness secrets ayurvedic yoga traditional therapies health tips svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.