-
डोळ्यांच्या पेशींचे पुनर्संचयित होणे
गाढ झोप घेतल्यावर डोळ्यांमध्ये रक्ताभिसरण सुधारते, त्यामुळे विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात आणि पोषक घटक शोषले जातात. ही नैसर्गिक प्रक्रिया डोळ्यांच्या पेशींना ताजेतवाने ठेवते. झोपेचा दीर्घकालीन अभाव मात्र काचबिंदूसारख्या आजारांना कारणीभूत ठरू शकतो. -
कोरडेपणा आणि जळजळ टाळली जाते
अपुरी झोप झाल्यास डोळ्यांतील अश्रूंचे प्रमाण कमी होते. यामुळे खाज सुटणे, कोरडेपणा आणि जळजळ निर्माण होते. संशोधनानुसार, झोपेची कमतरता अश्रू ग्रंथींवर परिणाम करते, परंतु विश्रांतीनंतर ही लक्षणे कमी होऊ शकतात. -
डोळ्यांचा ताण कमी होतो
झोपेच्या अभावामुळे डोळ्यांवर ताण येतो. सतत स्क्रीनकडे पाहिल्यामुळे सिलीरी स्नायूंवर जास्त ताण पडतो आणि धूसर दृष्टी, थकवा तसेच पापण्या मुरगळण्याची समस्या वाढू शकते. पुरेशी झोप घेतल्यास हे टाळता येते. -
काचबिंदूचा धोका कमी होतो
अस्वस्थ झोप, झोपेमध्ये श्वसनक्रिया बंद होणे यांसारखे झोपेचे विकार काचबिंदूचा धोका वाढवतात. खूप कमी किंवा खूप जास्त झोप घेतल्यासही डोळ्यांच्या ऑप्टिक नर्व्हला हानी पोहोचू शकते, त्यामुळे संतुलित झोपेचा कालावधी महत्त्वाचा आहे. -
सूज आणि काळी वर्तुळे टाळली जातात
थकव्याचा पहिला परिणाम डोळ्यांवर दिसतो. अपुरी झोप घेतल्यास डोळ्याखाली सूज, काळी वर्तुळे, द्रव साचणे आणि रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होतात. पुरेशी झोप घेतल्यास हा त्रास टाळता येतो. -
डोळ्यांची प्रतिकारशक्ती वाढते
गाढ झोप रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते, त्यामुळे डोळ्यांच्या संसर्गांपासून सुरक्षितता मिळते आणि जळजळ होण्याची शक्यता कमी होते.
झोपेचा डोळ्यांच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या महत्त्वाची माहिती…
गाढ झोप घेतल्याने डोळ्यांच्या पेशी पुनर्संचयित होतात, कोरडेपणा टाळता येतो आणि काचबिंदूचा धोका कमी होतो.
Web Title: Sleep for healthy eyes better vision natural care glaucoma prevention eye protection svk 05