-
छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी, ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री प्रिया मराठे आता या जगात नाही. केवळ ३८ वर्षांच्या तरुण वयात प्रियाने कर्करोगाशी लढता लढता अखेरचा श्वास घेतला.
-
मराठी मालिकांमध्येही तिनं स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. पण, आयुष्याच्या या टप्प्यावर कर्करोग नावाच्या निर्दयी आजारानं तिचं सगळ्या स्वप्नांसह करिअर आणि आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकलं.
-
काही काळापासून ती कर्करोगाशी झुंज देत होती. सुरुवातीला उपचारांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात होतं; पण अचानक आजारानं आक्रमक रूप धारण केलं. शरीरावरील कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि शरीरानं उपचारांना प्रतिसाद देणं थांबवलं.
-
कमी वयात कर्करोग होण्याची प्रकरणे वाढत चालली आहे. प्रिया मराठेच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून, महिलांनी आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे.
-
कर्करोग हा आजार जगातील सर्वांत भयंकर आजारांपैकी एक मानला जातो. सर्वांत मोठी धोकादायक बाब म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात हा आजार ओळखू येत नाही.
-
लक्षणं अगदी साधी-सुधी वाटतात आणि रुग्णाला उशिरा त्याची जाणीव होते, तोपर्यंत परिस्थिती गंभीर झालेली असते. कर्करोगाचे वेळेवर निदान झाल्यास उपचार शक्य आहेतच; मात्र उशिरा कळल्यास जीव वाचवणं अत्यंत कठीण ठरतं.
-
पुढे सांगितलेल्या कॅन्सरच्या लक्षणांना अजिबात दुर्लक्ष करू नका. १. सतत थकवा जाणवणं. २. अनपेक्षित वजन कमी होणं. ३. शरीरात गाठ निर्माण होणं.
-
४. सतत खोकला राहणं. ५. पचनाच्या समस्या. ६. अचानक रक्तस्राव होणं. हे लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा; अन्यथा परिणाम जीवघेणे ठरू शकतात.
-
प्रिया मराठेच्या निधनानं मराठी-हिंदी मालिकांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. एक उमदं आयुष्य कर्करोगाच्या पडछायेत हरपलं आणि पुन्हा एकदा या दुर्धर आजाराची भीषणता लोकांसमोर आली. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम\Freepik)
प्रिया मराठेचा कॅन्सरमुळे मृत्यू; महिलांनो सावधान! ‘ही’ ६ धोकादायक लक्षणं वेळेत ओळखा; असू शकते कॅन्सरची सुरुवात
Cancer Symptoms in Women: अभिनेत्री प्रिया मराठे हरली कॅन्सरशी झुंज; महिलांमध्ये दिसणारी ‘ही’ ६ चिन्हं घ्या गंभीरतेने…
Web Title: Pavitra rishta fame priya marathe loses battle with cancer watch out for these 6 early signs pdb