-
मेंदूला आवश्यक विश्रांती न मिळाल्यास कामावर लक्ष केंद्रित करणे कठीण होते, साध्या गोष्टी विसरायला लागतात.
-
झोपेचा अभाव भूकेच्या संप्रेरकांवर परिणाम करतो, त्यामुळे सतत भूक लागते आणि साखरयुक्त किंवा कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांची इच्छा होते.
-
अपुरी विश्रांती त्वचेला दुरुस्तीची संधी देत नाही, परिणामी डोळ्यांखाली काळी वर्तुळे, सूज आणि थकलेला चेहरा दिसू लागतो.
-
जाग आल्यावरही शरीर थकल्यासारखे वाटणे हे झोपेच्या कमतरतेचे पहिले लक्षण मानले जाते.
-
कमी झोपेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि वारंवार सर्दी, ताप किंवा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
-
झोप अपुरी राहिल्यास मनस्थितीवर परिणाम होतो; चिडचिड, चिंता किंवा कारणाशिवाय निराशा जाणवू लागते.
-
हे संकेत शरीराकडून मिळणारे इशारे असून, दुर्लक्ष केल्यास आरोग्यावर दीर्घकालीन गंभीर परिणाम होऊ शकतो.
आरोग्यासाठी झोप का महत्त्वाची? शरीराचे ‘हे’ संकेत दुर्लक्ष करू नका
भूक वाढणे, काळी वर्तुळे, थकवा आणि एकाग्रतेवर परिणाम हे झोपेच्या कमतरतेचे संकेत
Web Title: These warning signs your body needs more sleep health tips svk 05