-
सोशल मीडियापासून तुमचे मानसिक आरोग्य कसे जपावे? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
-
तुमचा फीड क्युरेट करा: तुम्हाला प्रेरणा देतील, तुमच्या ज्ञानात भर घालतील किंवा तुम्हाला आनंद देतील अशाच अकाउंट्स फॉलो करा. तर जे अकाउंट्स नकारात्मकता किंवा तुलना करतात त्यांना अनफॉलो करा.
-
डिजिटल डिटॉक्स: डिजिटल डिटॉक्स: झोपण्यापूर्वी किंवा जेवण करताना फोन वापरणे बंद करा. यामुळे चिंता कमी करण्यास मदत होते, झोपेची गुणवत्ता सुधारते आणि तुम्हाला वास्तविक जगाशी पुन्हा कनेक्ट होता येते.
-
फक्त स्क्रोल करू नका : फक्त यांत्रिक पद्धतीने स्क्रोल करण्याऐवजी पोस्टमध्ये सक्रियपणे सहभागी व्हा. कमेट करा, शेअर करा किंवा मित्रांसोबत गप्पा मारा. यामुळे कनेक्शनची भावना वाढेल आणि एकटेपणा कमी होईल.
-
पोस्ट करण्यापूर्वी किंवा प्रतिक्रिया देण्यापूर्वी, थांबा आणि स्वतःला विचारा की, मी हे का करत आहे? सतत ऑनलाइन नकारात्मक भावना व्यक्त करण्याऐवजी खोल श्वास घ्या.
-
वेळेची मर्यादा निश्चित करा: अॅप्सवर तासनतास घालवल्याने डूम स्क्रोलिंग आणि थकवा जाणवू शकतो. बिल्ट-इन स्क्रीन टाइम ट्रॅकर्स (जसे की डिजिटल वेलबीइंग किंवा iOS स्क्रीन टाइम) वापरा आणि दिवसाला ठरवून दिलेली वेळेची मर्यादा पाळा.
-
मदत घ्या: जर सोशल मीडियामुळे चिंता किंवा नैराश्य येत असेल, तर थेरपिस्ट किंवा समुपदेशकाशी बोला.
सोशल मीडियापासून तुमचे मानसिक आरोग्य कसे जपावे, जाणून घ्या टिप्स
सोशल मीडियापासून तुम्ही तुमचे मानसिक आरोग्य कसे सुरक्षित ठेवू शकता ? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
Web Title: How to protect your mental health from social media 10246058 iehd import rak