• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. at what age should you stop drinking milk and best healthy alternatives to know svk

दूध पिणं कधीपर्यंत आरोग्यासाठी फायदेशीर व कोणत्या टप्प्यावर हानिकारक? घ्या जाणून …

दुधाचं पौष्टिक महत्त्व नाकारता येत नाही; पण वयानुसार पचनशक्ती बदलते. काहींना लॅक्टोज इंटॉलरेन्समुळे त्रास होतो. त्यामुळे कोणत्या वयात दूध थांबवावं आणि त्याऐवजी कोणत्या पर्यायांचा अवलंब करावा, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

September 15, 2025 13:44 IST
Follow Us
  • at what age stop drinking milk
    1/9

    लहानपणी दूध का अनिवार्य?
    जन्मानंतरच्या पहिल्या वर्षात आईचं दूध हेच सर्वांत पौष्टिक आणि सुरक्षित असतं. त्यानंतर साधं दूध लहानग्यांच्या वाढीसाठी आवश्यक कॅल्शियम आणि प्रोटीन्स पुरवतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 2/9

    १२ ते २४ महिन्यांच्या मुलांसाठी पर्याय
    या वयात हळूहळू गाईचं किंवा फोर्टिफाइड सोया दूध देता येतं. मात्र, ते गोड नसावं आणि फ्लेवरशिवाय असावं, जेणेकरून मुलांना योग्य पोषण मिळेल. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 3/9

    वयानुसार अपचनाच्या समस्या
    वयानुसार अनेकांची लॅक्टोज पचवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे दूध प्यायल्यावर गॅस, पोट फुगणं किंवा अपचनासारख्या समस्या जाणवू शकतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 4/9

    लॅक्टोज इंटॉलरन्सची लक्षणं
    सतत पोटात गोळे येणं, जुलाब होणं, फुगलेलं पोट दिसणं ही लक्षणं दिसली, तर दूध कमी करणं किंवा थांबवणं गरजेचं असतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 5/9

    सोया दूध – पौष्टिक पर्याय
    प्रोटीन्स आणि कॅल्शियमने समृद्ध असलेलं सोया दूध हा प्रौढांसाठी उत्तम पर्याय ठरतो. लॅक्टोज इंटॉलरन्स असणाऱ्यांना हे पचायला सोपं असतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 6/9

    बदामयुक्त दूध फायदेशीर
    हलकं, स्वादिष्ट व व्हिटॅमिन ईनं भरलेलं बदामयुक्त दूध आरोग्यासाठी फायदेशीर आहे. वजन सांभाळणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय मानला जातो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 7/9

    ओट दूधाची लोकप्रियता
    फायबरयुक्त आणि सहज पचणारं ओट दूध आजकाल तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होतंय. कॉफी किंवा स्मूदीमध्येही त्याचा वापर वाढला आहे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 8/9

    पोषण पूर्तता आवश्यकच
    दूध सोडलं तरी कॅल्शियम, व्हिटॅमिन D व B12 यांची कमतरता भरून काढणं गरजेचं आहे. म्हणूनच फोर्टिफाइड वनस्पती-आधारित दूध निवडणं योग्य ठरतं. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

  • 9/9

    शेवटी निर्णय तुमचा
    दुध प्यायचं की पर्यायी दूध निवडायचं हा निर्णय प्रत्येकानं आपल्या आरोग्याच्या गरजेनुसार घ्यावा. शंका असल्यास आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं उत्तम. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: At what age should you stop drinking milk and best healthy alternatives to know svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.