-

कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे, जो शरीराच्या कोणत्याही भागात कधीही होऊ शकतो. हा आजार तेव्हा होतो, जेव्हा शरीरातील पेशी अनियंत्रितपणे वाढू लागतात आणि निरोगी पेशींना नुकसान पोहोचवतात.
(फोटो सौजन्य: Freepik) -
कर्करोगाच्या आजारासाठी अनेक कारणे जबाबदार असू शकतात. जसे की धूम्रपान आणि तंबाखूचे जास्त सेवन, जास्त तळलेले, चरबीयुक्त आणि कमी पोषक अन्न कर्करोगास कारणीभूत ठरतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
शरीराची हालचाल कमी असणे, जास्त काळ प्रदूषणात राहणे आणि विषाणूजन्य संसर्ग यामुळेदेखील कर्करोग होऊ शकतो. या आजारासाठी अनुवांशिक कारणेदेखील जबाबदार आहेत. (फोटो सौजन्य: Freepik)
-
बाजारातील प्रोसेस्ड पदार्थ जसे की सॉस, हॉट डॉग, प्रोसेस्ड चिकन यांसारखे दीर्घकाळ वापरासाठी सोयीस्कर मानले जाणारे प्रोसेस्ड फूड आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.
-
फ्रेंच फ्राइज, समोसे, भटूरे असे जास्त तळळेले पदार्थ किंवा एकच पदार्थ पुन्हा तळून खाणे यामुळे देखील कर्करोग्यासारख्या गंभीर आजाराचा धोका उद्भवू शकतो.
-
बाजारात मिळणारे चिप्स, कुरकुरे, बिस्किट, सफेद ब्रेड यांसारख्या पदार्थांवर जास्त काळ टिकण्यासाठी केमिकल्सचा वापर केला जातो. सतत अशा पदार्थांच्या सेवनाने आजाराचा धोका वाढू शकतो.
-
सॉफ्ट ड्रिंक्स आणि पॅकेट बंद फ्रुट ज्यूसच्या सततच्या सेवनाने देखील अशा आजाराचा धोका वाढतो.
-
त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन हळूहळू कमी करून घरातील स्वच्छ, ताजा आहार घ्या, फळांचे सेवन करा, पुरेशी झोप, जास्त पाणी आणि नियमित व्यायाम केल्याने अशा आजारांपासून दूर राहण्यास मदत करेल.
(फोटो सौजन्य: Freepik)
मर्यादेपेक्षा ‘या’ पदार्थांचे सेवन म्हणजे कॅन्सरला आमंत्रण; आजपासूनच सोडून द्या…
Cancer Risk Foods: हा आजार तुमच्या दैनंदिन आहारात आढळणाऱ्या पदार्थांमुळे देखील होऊ शकतो.
Web Title: Cancer causing foods these foods cause cancer stop eating them sap