-
४३ वर्षीय अभिनेत्री इशा देओलने नुकतंच तिच्या स्मूदी प्रेमाबाबत सांगितलं. स्मूदीज अस्तित्त्वात येण्याच्या आधीपासून मला त्या आवडतात. मी लॉस एंजल्समध्ये पहिल्यांदा स्मूदी चाखली असं इशाने एका युट्यूब चॅनलच्या मुलाखतीत सांगितलं. (फोटो-इशा देओल, इन्स्टापेज)
-
स्मूदीबाबत विचारलं असता ठाण्यातील रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ अमरिन शेख म्हणाल्या स्मूदी हा लिक्विड डाएटसाठी उत्तम पर्याय असतो. फळं, भाज्या, दूध, दही दुधाला असणारे पर्याय एकत्र करुन स्मूदी तयार केली जाते. त्यातले फायबर काढले जात नाही. त्यामुळे स्मूदी पौष्टिक असते. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
स्मूदीज तुमचं पोषण वाढवण्यासाठी एक उत्तम पर्याय असतो. स्मूदीजमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे त्या पचायला हलक्या असतात. शिवाय त्यात आतड्यांच्या आरोग्यासाठी अँटिऑक्सिडंट्सही असतात. रोगप्रतिकारक शक्तीही मिळते. वजन नियंत्रणासाठी स्मूदी हा उत्तम पर्याय आहे असंही शेख यांनी सांगितलं. (छायाचित्र: अनस्प्लॅश)
-
स्मूदीजचे वेगवेगळे प्रकार असतात. आंबा, केळी, बेरी यांपासून स्मूदी तयार केली जाते. भाज्यांची स्मूदी पालक, काकडी यांपासून बनवली जाते. (फोटो: फ्रीपिक)
-
स्मूदीजमध्ये दही, नट बटर किंवा प्रोटीन पावडर यांचा वापर केला जातो. स्मूदी जेवणाला पर्याय म्हणून घेतल्यास स्नायू बळकट होण्यासही मदत होते. अनेकदा स्मूदीजमध्ये चिया सीड्सही वापरले जातात. पचनासाठी ते उत्तम आहेत. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
स्मूदीज तयार करताना त्यात साखर सिरप किंवा आईस्क्रीमचा वापर करु नका असं आहार तज्ज्ञ सांगतात. फळं, भाज्यांपैकी एक काहीतरी, दही, काजू, नट्स यांचा समावेश आवर्जून करा (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
मील स्मूदी हा नाश्त्याचा पर्याय म्हणून उत्तम आहे. पण रात्री जेवणही करायचं आणि साखर सिरप असलेली स्मूदीही प्यायची ही कल्पना आरोग्यदायी नक्की नाही. (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
-
स्मूदीजमध्ये फळांचा/ भाज्यांचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे त्या पौष्टिक ठरतात. मात्र साखर सिरप त्यात घालू नये. (छायाचित्र: फ्रीपिक)
-
स्मूदीजचा वापर नाश्त्याचा पर्याय म्हणून किंवा लिक्विड डाएट म्हणून सूज्ञपणे करता येतो. त्यामुळेच इशा देओलला अशा स्मूदीज आवडतात (छायाचित्र: गेटी इमेजेस/थिंकस्टॉक)
अभिनेत्री इशा देओलला का आवडतात स्मूदीज? आहार तज्ज्ञांचा या पेयाबाबत सल्ला काय?
स्मूदीज पौष्टिक असतात, त्यात साखर सिरप किंवा आईस्क्रीम घालू नका असा सल्ला आहार तज्ज्ञांनी दिला आहे.
Web Title: Esha deol loves smoothies benefits nutrition diet expert iehd import scj