-
तुम्हीही व्यायामाची सुरूवात करणे पुढे ढकलत आहात का? असं करणारे तुम्ही एकटे नाही आहात. उत्साहाने व्यायाम कसा सुरू करायचा त्याचे ६ सोपे उपाय आज आपण जाणून घेऊयात…
-
लहान सुरुवात करा: फक्त ५ मिनिट हालचाल करा, त्यात चालणे, काही स्ट्रेचिंग किंवा सोपा योग करा. बहुतेक लोक एकदा अशी सुरुवात केली की पुढे छान रमून व्यायाम करु लागतात.
-
एखाद्या बैठकीसारखे वेळापत्रक तयार करा: तुमच्या कॅलेंडरवर तुमचा व्यायामाचा वेळ मार्क करा. तो स्वतःशी एक अजिबात न टाळता येणारी अपॉइंटमेंट म्हणून स्वीकारा.
-
तुम्हाला आवडणारी अॅक्टिव्हिटी निवडा: धावणे आवडत नसेन तर नृत्य, सायकलिंग किंवा योग करून पहा. तुम्हाला खरोखर आनंद देणाऱ्या वर्कआउट्स करत राहण्याचा प्रयत्न करा.
-
आगाऊ तयारी करा: आदल्या रात्री व्यायामाचे कपडे आणि शूज तयार ठेवा. यामुळे निर्णय घेण्याचा विचार दूर होतो आणि सुरुवात करणे सोपे होते.
-
एक जबाबदार सहकारी मिळवा: मित्रांसोबत व्यायाम करा किंवा फिटनेस क्लासमध्ये सामील व्हा. तुमच्याशी कोणीतरी तुमच्यासारखा धेय्य ठेवाणारा व्यक्ती फायदेशिर ठरु शकतो.
-
स्वतःला बक्षीस द्या: लहान अचिव्हमेंट्स सेलिब्रेट करा. सकारात्मक राहा. व्यायामानंतर रिलॅक्स करा, स्मूदी एन्जॉय करा.
हेही पाहा- एक सेकंदही… पृथ्वी फिरायची थांबली तर…? हार्वर्ड विद्यापिठातील खगोलशास्त्रज्ञाने दिलंय उत्तर…
व्यायामाची सुरुवात करण्यास चालढकल करताय? ‘या’ सहा मार्गांनी करा नवी सुरुवात…
तुम्हीही एक्सरसाईज करण्यासाठी कंटाळा, चालढकल करत आहात? तर जाणून घ्या व्यायामास प्रोत्साहन देणारे काही सोपे उपाय…
Web Title: How to stop procrastinating exercise 6 simple ways to get back on your feet spl