-
नवरात्री उपवासाच्या काळात बहुतेक जण अन्न सेवन करीत नाहीत आणि फलाहार घेतात. या नऊ दिवसांत साबुदाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. (Photo: Unsplash)
-
परंतु, प्रत्येकासाठीच साबुदाणा खाणे योग्य नसते. काहींसाठी तो हानिकारक ठरू शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या लोकांनी साबुदाण्याचे सेवन टाळावे. (Photo: Unsplash)
-
मधुमेह असलेल्यांनी मधुमेह असलेल्या लोकांनी साबुदाणा टाळावा. कारण- त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स ६७ ते ९० इतका उच्च असून, त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. (Photo: Pexels)
-
वजन कमी करू इच्छिणारे ज्यांचे वजन आधीच जास्त आहे किंवा जे वजन कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांनीही साबुदाण्यापासून दूर राहावे. त्यात कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असल्याने वजन वाढू शकते. (Photo: Pexels)
-
थायरॉईडचे रुग्ण थायरॉईड असलेल्या रुग्णांनी साबुदाणा खाण्याचे टाळावे किंवा अगदीच कमी प्रमाणात खावे; अन्यथा समस्या वाढू शकते. (Photo: Pexels)
-
पचनाच्या तक्रारी असलेले ज्यांना पोटाचे विकार आहेत, त्यांनीही साबुदाणा खाणे टाळावे. त्यात असलेले झिंक पोट फुगणे, बद्धकोष्ठता व पोटदुखी यांसारख्या त्रासांना कारणीभूत ठरू शकते. (Photo: Freepik)
-
लो बीपी असलेले लोक साबुदाण्यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असल्याने ब्लडप्रेशर कमी होऊ शकतो. त्यामुळे ज्यांना लो बीपीची समस्या आहे, त्यांनी याचा वापर करू नये. (Photo: Freepik)
-
किडनीचे रुग्ण किडनी स्टोन किंवा किडनीशी संबंधित समस्या असणाऱ्यांनी साबुदाणा खाणे टाळावे. त्यात असलेले कॅल्शियम किडनीच्या समस्या वाढवू शकते. (Photo: Freepik)
नवरात्रीमध्ये उपवास करताय? ‘या’ लोकांनी टाळावी साबुदाण्याची खिचडी
नवरात्रीतील उपवास आरोग्यदायी आहेत; पण त्यासाठी योग्य आहार घेणे महत्त्वाचे आहे. म्हणूनच साबुदाणा प्रत्येकासाठी लाभदायी ठरेलच असे नाही, हे लक्षात ठेवा.
Web Title: Navratri fasting these people dont eat tapioca sabudana khichdi warnings health tips svk 05