-
आरोग्यासाठी उपयुक्त असलेली पेयांची यादी आता ग्रीन टीपुरती मर्यादित न राहता इतर अनेक ड्रिंक्सकडे ग्राहकांचा कल वाढताना दिसतो आहे.
-
बीटाचा रस (Beetroot juice) नायट्रेट्सने समृद्ध असून रक्तप्रवाह सुधारते.
-
बोन ब्रॉथ (Bone broth) मध्ये कोलेजन आणि खनिजे असल्यामुळे सांधे, त्वचा आणि हाडांच्या स्वास्थ्याला मदत होते.
-
नारळपाणी (Coconut water) नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्सचा स्रोत ठरून शरीराला पुनरुज्जीवन आणि हायड्रेशन देते.
-
दुधाची पेये (Fermented dairy drinks) प्रोबायोटिक्सने परिपूर्ण असून आतड्यांचे आरोग्य आणि पचन सुधारतात.
-
कॅमोमाइल, पुदिना अशा हर्बल चहामुळे मन शांत राहण्यास, झोप सुधारण्यास आणि पचनासाठी उपयुक्त ठरतात.
-
कोम्बुचा (Kombucha) हा फर्मेंटेड चहा असून प्रोबायोटिक्समुळे गट हेल्थसाठी फायदेशीर आहे.
-
माचा (Matcha latte) ही कॉफी अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असून लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि चयापचय वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.
-
हळदीचे दूध (Turmeric milk) कुरक्युमिन घटकामुळे दाह कमी करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. (सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)
ग्रीन टीच्या पलीकडे! आरोग्यासाठी उपयुक्त असलेले ‘हे’ आरोग्यदायी पेय
बीटाचा रस, बोन ब्रॉथ, कोम्बुचा ते हळदीचे दूध शरीर तंदुरुस्त ठेवणाऱ्या या पेयांकडे वाढतोय कल
Web Title: Functional beverages drinks beyond green tea benefits of health tips svk 05