-
यंदा २२ सप्टेंबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. (फोटो सौजन्य: AI)
-
भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त असून, संपूर्ण वर्षभरात एकूण चार नवरात्री असतात. पहिली नवरात्र चैत्र महिन्यात असते, तर दुसरी शारदीय नवरात्र आश्विन महिन्यात साजरी केली जाते आणि इतर दोन नवरात्री या गुप्त स्वरूपात असतात. (फोटो सौजन्य: AI)
-
परंतु, चैत्र आणि अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली (फोटो सौजन्य: AI)
-
नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या पूजा-आराधनेसह काही नियमांचे पालन करणेदेखील खूप महत्त्वाचे आहे, ज्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यापाठी राहील. (फोटो सौजन्य: AI)
-
नवरात्रीच्या दिवसांत तुमच्या घरामध्ये घटस्थापना झाली असेल तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेऊ नका, घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवे. (फोटो सौजन्य: AI)
-
हिंदू धर्मामध्ये लहान मुलींना देवीचे रूप मानले जाते, त्यामुळे नवरात्रीच्या काळात लहान मुलींचे मन दुखवू नका. शिवाय फक्त मुलीच नाही तर नेहमीच सर्व स्त्रियांचा आदर करावा.
(फोटो सौजन्य: AI) -
नवरात्रीच्या काळात कांदा, लसूण आणि मांसाहार करू नये, कारण यामुळे मनामध्ये तामसिक विचार येतात, जे देवीच्या पूजा-आराधनेमध्ये अडथळा निर्माण करू शकतात.(फोटो सौजन्य: AI)
-
नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस किंवा नखे कापू नये असे म्हटले जाते.
(फोटो सौजन्य: AI) -
नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवं. या काळात कोणावरही चिडू नये. घरामध्ये कलह करू नये, कारण जिथे सतत कलह असतो त्या ठिकाणी देवी लक्ष्मी वास करत नाही.
(फोटो सौजन्य: AI)
देवी भगवतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसांमध्ये ‘ही’ चुकूनही करू नका
Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीच्या पूजा-आराधनेसह काही नियमांचे पालन करणेदेखील खूप महत्त्वाचे आहे, ज्यामुळे देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्यापाठी राहील.
Web Title: To get the blessings of goddess bhagwati do not do this during navratri sap