-
ज्योतिषशास्त्रानुसार ऑक्टोबर महिना अत्यंत खास असणार आहे. कारण- या महिन्यात नवग्रहातील काही ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होणार आहे.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
ज्यात सगळ्यात आधी बुध ग्रह असेल. बुध ३ ऑक्टोबर रोजी तूळ राशीत प्रवेश करेल. तर शुक्र ९ ऑक्टोबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
१७ ऑक्टोबर रोजी सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार असून १९ ऑक्टोबर रोजी गुरू कर्क राशीत गोचर करेल. त्यानंतर २७ ऑक्टोबरला मंगळ स्वराशी वृश्चिकमध्ये गोचर करेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
या ५ ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींना अधिक शुभ परिणाम पाहायला मिळेल.(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
मिथुन राशीच्या लोकांसाठा हा महिना अत्यंत फायदेशीर असेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. नवे विचार मनात येतील. धनलाभ होईल, आध्यत्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसाय यश मिळेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींना भाग्याची पूर्ण साथ मिळेल. त्यांची अडकलेली कामे पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कुंभ राशींच्या व्यक्तींसाठीही ऑक्टोबर महिना खूप खास असणार आहे. या काळात तुम्हाला अनेक सुख, सुविधा प्राप्त होतील. अचानक धनलाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरी, व्यवसायामध्ये यश मिळेल; तसेच गुंतवणूक करणेही फायदेशीर ठरेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
ऑक्टोबर महिना सोन्यासारखा पैसा देणार, पाच ग्रहांचे महागोचर तीन राशींना आकस्मिक धनलाभासह प्रेमात सुख देणार
October 2025 Horoscope: या ५ ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा १२ पैकी काही राशीच्या व्यक्तींना अधिक शुभ परिणाम पाहायला मिळेल.
Web Title: October rashifal budh surya mangal shukra and guru graha rashi parivartan these three zodic get wealthy and healthy sap