-
नीरा किंवा ताडी : ताडाच्या झाडापासून नीरा काढली जाते. ही नीरा नैसर्गिकरित्या गोड असते. थंडगार आणि ताजी नीरा प्यायल्याने पोटाचं आरोग्य सुधारतं. ही नीरा जर काही वेळासाठी तशीच ठेवली तर ती आंबते. ज्या पेयाला ताडी असं म्हटलं जातं. यात अल्कोहोल नसतं. महाराष्ट्र आणि केरळमध्ये नीरा पिण्याची प्रथा आहे.
-
कांजी हे पेय असं आहे जे हिवाळ्यात प्यायलं जातं. गाजर, मोहरी याचा उपयोग करुन कांजी बनवली जाते. याचा रंग जांभळासारखा होतो. या पेयाची चव तिखट, मसालेदार आणि थोडी आंबट असते. होळीच्या वेळी हे पेय पिण्याची उत्तर प्रदेशमध्ये प्रथा आहे. पचनाच मदत करणाचं पेय म्हणून कांजी ओळखली जाते.
-
रोडोडेंड्रॉन ज्यूस हे एक लाल रंगाचं पेय आहे. याला बुरांश सरबतही म्हटलं जातं. रोडोडेंड्रॉन फुलांच्या पाकळ्यांपासून हे पेय तयार करतात. हृदयाच्या आरोग्यासाठी हे पेय उत्तम असतं. उच्च रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी या पेयाचं सेवन केलं जातं.
-
छंग हे पेय हिमाचल प्रदेशात पिण्याची प्रथा आहे. बार्लीचा समावेश असलेलं हे पेय आहे. लाकडी मगमध्ये हे पेय दिलं जातं. धार्मिक उत्सवाच्या वेळी हे पेय पिण्याची प्रथा लडाख, सिक्कीम आणि हिमाचल प्रदेशमध्ये आहे.
-
महुआ अर्थात मोहाच्या फुलांपासून तयार करण्यात आलेलं पेय. मोहाची फुलं गोड असतात. आदिवासी समाजात मोहापासून मद्य तयार केलं जातं. मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि काही प्रमाणात महाराष्ट्रातला आदिवासी समाज या पेयाचं सेवन करतो.
-
झुथो हे नागालँडमध्ये प्यायलं जाणारं एक पेय आहे. तांदळापासून आणि फळांपासून हे पेय तयार केलं जातं. याची चव बिअरसारखी तुरट असते. अनेक वर्षांपासून नागालँडमध्ये हे पेय प्यायलं जातं. स्टार्टर म्हणूनही झुथो पिण्याची प्रथा आहे.
भारतात प्यायली जाणारी ही दुर्मिळ पण खास चवीची पेयं तुम्हाला ठाऊक आहेत का?
भारतात चहा आणि कॉफी ही पेयं सर्रास देशभरात प्यायली जातात. पण आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा पेयांबाबत जी काहीशी दुर्मिळ आहेत. त्यांची चव चाखायची असेल तर त्याच राज्यांमध्ये जावं लागेल.
Web Title: Rare drinks in india you may not know about iehd import scj