-
सध्याच्या घडीला लठ्ठपणा आणि वाढलेलं वजन ही एक समस्या झाली आहे. आपण समजून घेऊ वजन कमी करणं आणि चरबी कमी करणं यात नेमका काय फरक आहे?
-
वजन कमी करणं म्हणजे तुमच्या शरीराचं वजन कमी करणं. ज्यामध्ये चरबी, स्नायू यांच्यासह अगदी पाण्याचंही प्रमाण कमी होतं. पण यामुळे तुम्ही निरोगी राहू शकताच असं नाही.
-
चरबी कमी करणं म्हणजे काय? शरीरात साठवलेली अतिरिक्त चरबी कमी करण्यावर लक्ष केंद्रीत करणं जी नियमित व्यायाम आणि संतुलित आहारामुळे होते. तसंच यामुळे वजनही नियंत्रणात राहतं.
-
क्रॅश डाएट आणि खूप सारा व्यायाम अगदी चार तासांचा व्यायाम यामुळे वजन कमी होतं. पण प्रत्यक्षात ते शरीरातील पाणी आणि स्नायू यांचं वजन कमी झाल्याने वजन कमी होतं. शरीरातील चरबी तशीच साठून राहू शकते.
-
वजन कमी करण्यापेक्षा चरबी कमी करण्यावर भर दिल्यास लठ्ठपणाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. शरीराची चयापचय क्रिया अर्थात मेटाबॉलिझम वाढतो. शरीराची एकूण रचना सुधारते आणि वजन नियंत्रणात येतं.
-
चरबी कमी करण्यासाठी मुख्यत्वे संतुलित आहार ज्यात प्रथिनांचा आणि फायबर्सचा समावेश असेल तसंच व्यायाम प्रकारांमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ करणं यामुळे शरीरातली चरबी कमी होण्यास मदत होते.
-
वजन कमी करण्याच्या मागे लागण्यापेक्षा चरबी कमी करण्यावर भर द्या. त्यामुळे शरीरात परिवर्तन घडेल आणि वजन आपोआप नियंत्रणात येईल.
वजन कमी करणं आणि चरबी कमी करणं यात नेमका काय फरक आहे?
वजन आणि चरबी कमी करण्यामधील फरकाबद्दल तुम्हाला जे काही माहित असणे आवश्यक आहे ते येथे आहे.
Web Title: Weight loss vs fat loss the difference iehd import scj