-
दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी ‘जागतिक हृदय दिवस’ साजरा करण्यात येतो. लोकांना हृदयाच्या आरोग्याबद्दल जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
मुंबईच्या नानावटी रुग्णालयातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कार्डियोलॉजिस्ट डॉ. राजीव भागवत व ज्येष्ठ शल्यचिकित्सक डॉ. अविनाश सुपे यांनी हृदयविकाराचा झटका व हार्टबर्नमधला फरक आणि लक्षणे सांगितली आहे.
-
हृदयविकाराचा झटका येताना डाव्या हातामध्ये किंवा छातीच्या डाव्या भागात वेदना होऊ लागतात. पण काही अपवादाच्या वेळी तुम्हाला धडाच्या वरील भागात कोणत्याही बाजूला वेदना होऊ शकतात.
-
पाठ, मान, जबडा, दात, खांदा आणि स्तनाच्या भागात सुद्धा यामुळे वेदना जाणवू शकतात.
-
कधीकधी हृदयविकाराचा झटका येण्याआधी तुमच्या छातीच्या मध्यभागी जळजळ होऊ लागते, तुम्हाला घाम फुटू लागतो याचे कारण म्हणजे, छातीत वारंवार जळजळ होत असल्याने हृदयापर्यंत पोहोचणारा रक्तप्रवाह कमी होतो आणि हृदयाचे काम थांबून झटका येऊ शकतो.
-
छातीत जळजळ म्हणजे तुमच्या अन्ननलिकेमध्ये पाचक ऍसिड गेल्यामुळे होणारी अस्वस्थता किंवा वेदना.
-
हे छातीत आणि वरच्या ओटीपोटात जळजळ आणि अस्वस्थतेद्वारे ओळखता येते. सहसा, जड जेवणानंतर अशी लक्षणे दिसून येतात.
-
अँटासिड्सने यावर उपचार केला जाऊ शकतो. सहसा औषध घेतल्यावर किंवा चालल्यावर सुद्धा हा त्रास नियंत्रणात येतो.
-
खरं तर, छातीत जळजळ, हृदयविकाराचा झटका व कार्डियाक अरेस्ट खूप एकसारखे वाटू शकतात पण फक्त शारीरिक लक्षणे पाहून तुम्ही फरक सांगू शकत नाही. पण कोणतेही लक्षात १५ मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकत असल्यास, दवाखान्यात जाणेच हिताचे ठरेल.
-
साधारणपणे जास्त तिखट व तेलकट पदार्थामुळे हे होते असा समज आहे व तो खरा आहे.
-
अनेकदा हार्टबर्न म्हणजेच हृदयविकाराचा झटका असे नसले तरी ही हार्टअटॅक येण्याची पहिली पायरी असू शकते.
-
(हेही पाहा : पचनशक्ती सुधारण्यासाठी नक्की वापरा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय)
World Heart Day 2025: हृदयविकाराचा झटका व हार्टबर्नमध्ये फरक काय? शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे
हृदयविकाराचा झटका येताना डाव्या हातामध्ये किंवा छातीच्या डाव्या भागात वेदना होऊ लागतात.
Web Title: World heart day 2025 these are the symptoms of heart attack and heart burn by expert doctors sdn