-
ओट्समध्ये विरघळणारे फायबर (Soluble Fiber) भरपूर प्रमाणात असतात, जे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करते. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
सकाळी भिजवलेले मेथीचे दाणे खाणे किंवा मेथीचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. यात असलेले घटक आतड्यांमधील कोलेस्ट्रॉल बांधून त्याचे शोषण थांबवते.
-
लसूणमध्ये ऍलिसिन (Allicin) नावाचे संयुग असते, जे एकूण कोलेस्ट्रॉल (Total Cholesterol) आणि खराब कोलेस्ट्रॉल (LDL Cholesterol) कमी करण्यास मदत करते.
-
रोज सकाळी कच्च्या लसणाच्या १-२ पाकळ्या खाणे किंवा स्वयंपाकात जास्त वापर करणे उपयुक्त आहे.
-
आवळ्याचे नियमित सेवन खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते.
-
अक्रोड हा ओमेगा-३ फॅटी ऍसिड (Omega-3 Fatty Acids) आणि फायबरचा चांगला स्रोत आहे.
-
अक्रोड हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
-
मसूर, हरभरा, राजमा, आणि चवळी यांसारख्या कडधान्यांमध्ये प्रोटीन आणि फायबर जास्त असते, जे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
-
हळदीतील कर्क्युमिन (Curcumin) खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते.
Cholesterol Health: कोलेस्ट्रॉलची पातळी नैसर्गिकरित्या कमी करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ
अक्रोड हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक आहेत आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात.
Web Title: Eat these healthy food regularly to lower cholesterol level naturally at home sdn