• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. late night snacking dangerous nutritious foods 10221653 iehd import rak

‘हेल्दी’ असूनही धोकादायक! जाणून घ्या रात्री उशिरा स्नॅक्स खाण्याचे धोके

जरी पौष्टिक पदार्थ खात असाल तरी रात्री उशिरा खाणे आरोग्यदायी नाही, याचे काय धोके आहेत ते आपण जाणून घेणार आहोत.

October 11, 2025 00:16 IST
Follow Us
  • late night snacking, health
    1/7

    आपल्या सर्वांना झोपायच्या आधी काहीतरी खाण्याची इच्छा होते . फळे, काजू किंवा इतर तथाकथित हेल्दी स्नॅक्स खाण्याचा काही वाईट परिणाम होणार नाही असे वाटू शकते, परंतु रात्री उशिरा खाणे तुमच्या शरीरासाठी आश्चार्यकारकरित्या वाईट ठरू शकते. पौष्टिक पदार्थ जरी खात असाल तीर रात्री उशिरा खाणे तुम्हाला वाटते तितके आरोग्यदायी नाही.

  • 2/7

    सर्केडियन रिदम बिघडतो: रात्रीच्या वेळी तुमच्या शरीराचे चयापचय मंदावते, ज्यामुळे शरीर विश्रांती आणि दुरुस्तीसाठी तयार होते. अशा वेळी, साधे पौष्टिक अन्न खाल्ल्यानेही शरीराला जागृत राहण्याचा संकेत मिळतो, ज्यामुळे तुमची सर्केडियन रिदम (circadian rhythm) विस्कळीत होते आणि नैसर्गिक हार्मोन सायकलमध्ये अडथळा येतो.

  • 3/7

    पचनक्रिया बिघडते: रात्रीच्या वेळी पचनक्रिया कमकुवत होते कारण जठरांत्रीय प्रणाली मंदावते. रात्री उशिरा जेवल्याने अपचन, पोटफुगी आणि अॅसिड रिफ्लक्स होऊ शकते, ज्यामुळे झोप कमी होते आणि आतड्यांची कार्यक्षमता कमी होते.

  • 4/7

    रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो : रात्री उशिरा खाल्ल्याने रक्तातील साखर वाढते, कारण या वेळी शरीर तिच्यावर प्रक्रिया करण्यास सर्वात कमी तयार असते. यामुळे ग्लुकोजची पातळी एकदम वाढू शकते , ज्यामुळे कालांतराने इन्सुलिन प्रतिरोध वाढतो आणि हा मधुमेहासाठी एक धोकादायक घटक आहे.

  • 5/7

    चरबी साठते: रात्री उशिरा खाल्लेल्या कॅलरीज ऊर्जेसाठी वापरल्या जाण्याची शक्यता कमी असते आणि त्या शरीरात चरबीच्या रूपात साठवल्या जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे, बदाम किंवा स्मूदीसारखे पौष्टिक पदार्थ देखील झोपण्यापूर्वी नियमित खाल्ले गेल्यास, वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात.

  • 6/7

    झोपेची गुणवत्ता कमी करते: झोपण्यापूर्वी खाल्ल्याने मेलाटोनिनच्या निर्मितीत व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे झोपी जाणे आणि झोपून राहणे कठीण होते. कमी झोपेमुळे खाण्याची इच्छा वाढते आणि चयापचय विस्कळीत होते, ज्यामुळे थकवा आणि जास्त खाण्याचे चक्र तयार होते.

  • 7/7

    छातीत जळजळ आणि जीईआरडीचा (GERD) धोका वाढतो : खाल्ल्यानंतर लगेच झोपल्याने पोटातील आम्ल अन्ननलिकेतून वर जाणे सोपे होते, ज्यामुळे छातीत जळजळ होते किंवा जीईआरडीची (Gastroesophageal Reflux Disease) लक्षणे वाढतात. रात्री उशिरा फळे किंवा दही यांसारखे अन्न खाल्ले तरीही हा धोका कायम राहतो.

TOPICS
मराठी बातम्याMarathi News

Web Title: Late night snacking dangerous nutritious foods 10221653 iehd import rak

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.