• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. guava powerhouse fruit lower cholesterol control diabetes ease constipation svk

पेरू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि बद्धकोष्ठतेवर खरंच फरक पडतो का?

सकाळी रिकाम्या पोटी खाल्लेला पेरू शरीर स्वच्छ ठेवतो

October 13, 2025 13:54 IST
Follow Us
  • guava impotatnts
    1/9

    पेरू हे साधं, सर्वसामान्य दिसणारं फळ असलं तरी त्यात आरोग्यदायी गुणांची खाण दडलेली आहे. कोलेस्ट्रॉल कमी करणे, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे आणि पचन सुधारण्यास हे फळ अत्यंत उपयुक्त ठरते.

  • 2/9

    आहारतज्ज्ञांच्या मते, सकाळच्या वेळी पेरू खाल्ल्यास शरीरातील पचनसंस्था स्वच्छ राहते. पेरूमधील जास्त तंतुमय घटकांमुळे पोट साफ होते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

  • 3/9

    पेरूमध्ये असलेले ‘सॉल्युबल फायबर’ आतड्यांना सैल करतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते. हे नैसर्गिक रेचक (laxative) म्हणून काम करते आणि पचन संस्थेचे आरोग्य सुधारते.

  • 4/9

    मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरू एक वरदान आहे. याचा ग्लायसेमिक इंडेक्स फक्त १२ ते २४ दरम्यान असल्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते आणि ती स्थिर राहते.

  • 5/9

    पेरूमध्ये असलेले फायटो न्यूट्रिएंट्स लाइकोपीन आणि फ्लावोनॉइड्स  हे कर्करोगाशी लढा देणारे घटक आहेत. हे शरीरातील पेशींचे संरक्षण करतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.

  • 6/9

    संशोधनानुसार, पेरूच्या पानांचा चहा आठ आठवडे नियमित घेतल्यास एलडीएल (वाईट) कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स कमी होतात आणि चांगले कोलेस्ट्रॉल (एचडीएल) वाढते.

  • 7/9

    पेरूच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल व अँटीव्हायरल गुणधर्म आहेत, त्यामुळे घसा खवखवणे, श्वसनाचे विकार, तसेच सौम्य ॲलर्जी यावरही त्याचा उपयोग होतो.

  • 8/9

    एका पूर्ण पेरूमध्ये अंदाजे ३७ कॅलरी, ३ ग्रॅम तंतू, ८ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि आवश्यक खनिजे असतात, त्यामुळे हे कमी कॅलरीचे पण पोषक तत्त्वांनी भरलेले फळ आहे.

  • 9/9

    अभ्यासानुसार, पेरूच्या पानांचा अर्क स्त्रियांच्या मासिक पाळीतील वेदना कमी करण्यास मदत करतो. यामधील मॅंगनीज आणि तांबे शरीरातील हार्मोनल संतुलन राखतात. (सर्व फोटो सौजन्य : फ्रीपिक)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyle

Web Title: Guava powerhouse fruit lower cholesterol control diabetes ease constipation svk 05

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.