-

भारतात अनेक राजा-महाराजांनी सुंदर व मजबूत असे राजवाडे बांधून ठेवले आहेत. त्यापैकी अनेक राजवाडे आता पर्यटकांसाठी खुले आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा काही राजवाड्यांची माहिती देणार आहोत जिथे तुम्हाला अप्रतिम वास्तूकला, समृद्ध इतिहास व सांस्कृतिक वारशाचा संगम पाहायला मिळेल. (Photo Source : Wikimedia Commons)
-
चौमहल्ला पॅलेस, हैदराबाद : असफ जाही राजवंशाचा हा राजवाडा चौमहल्ला पॅलेस भव्य अंगण, भव्य हॉल, विंटेज कार आणि शाही कलाकृतींच्या उत्कृष्ट संग्रहांसाठी ओळखला जातो.(Photo Source : Wikimedia Commons)
-
सिटी पॅलेस, जयपूर : राजपूत आणि मुघल वास्तुकलेचे मिश्रण असलेला जयपूरमधील सिटी पॅलेस संग्रहालये आणि राजेशाही थाटासाठी प्रसिद्ध आहे. या राजवाड्याचं देखणं अंगण पाहून तुम्हाला इथेच बसावसं वाटेल. (Photo Source : Wikimedia Commons)
-
फलकनुमा पॅलेस, हैदराबाद : एका टेकडीच्या माथ्यावर बांधण्यात आलेल्या फलकनुमा पॅलेसमध्ये व्हेनेशियन झुंबर, विस्तीर्ण बागा आहेत, ज्या निजाम काळातील वैभवाची आलिशान झलक देतात.(Photo Source : Wikimedia Commons)
-
लेक पॅलेस, उदयपूर : हा पिचोला सरोवराच्या मधोमध बांधण्यात आलेला अतिशय सुंदर आणि आलिशान राजवाडा आहे. १८ व्या शतकात महाराणा जगतसिंह (दुसरे) यांनी हा राजवाडा बांधला होता. संपूर्ण पांढऱ्या संगमरवरी दगडांचा वापर करून बांधलेला हा राजवाडा राजस्थान पर्यटनासाठी गेलेल्या प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये असतो. (Photo Source : Wikimedia Commons)
-
म्हैसूर पॅलेस, कर्नाटक : चमकदार दरबार हॉलसाठी, दक्षिण भारतीय नक्षीकामासाठी हा राजवाडा प्रसिद्ध आहे. म्हैसूर पॅलेसमध्ये इंडो सारासेनिक वास्तुकला आणि शाही वैभवाचं प्रदर्शन पाहायला मिळतं.(Photo Source : Wikimedia Commons)
-
उमेद भवन पॅलेस, जोधपूर: जगातील सर्वात मोठ्या खासगी निवासस्थानांपैकी एक असलेल्या उमेद भवन पॅलेसमध्ये आर्ट डेको आणि पारंपारिक राजस्थानी वास्तुकला यांचा मेळ पाहायला मिळतो. त्याचा काही भाग आता एक लक्झरी हॉटेल म्हणून वापरला जातो. (Photo Source : Wikimedia Commons)
भारतातील आवर्जून भेट द्यावीत असे राजवाडे
आज आम्ही तुम्हाला अशा काही राजवाड्यांची माहिती देणार आहोत जिथे तुम्हाला अप्रतिम वास्तूकला, समृद्ध इतिहास व सांस्कृतिक वारशाचा संगम पाहायला मिळेल.
Web Title: Must visit palaces in india mysore to udaipur iehd import asc