-
आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे अनेकांना कमी वयातच सांधेदुखी, हातपाय सुजणे आणि शरीरातील ताठरपणा यांसारख्या तक्रारी जाणवतात. (फोटो सौजन्य: FreepiK)
-
बहुतेकजण याला वाढत्या वयाचा परिणाम समजतात, पण खरा दोष असतो शरीरात वाढणाऱ्या युरिक अॅसिडचा. (फोटो सौजन्य: FreepiK)
-
हेच युरिक अॅसिड हळूहळू हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये साचतं आणि नंतर गाठींसारख्या असह्य वेदनादायक आजाराचं कारण ठरतं. (फोटो सौजन्य: FreepiK) -
परंतु याव्यतिरिक्त युरिक अॅसिडचा प्रभाव तुमच्या त्वचेवरही होऊ शकतो. (फोटो सौजन्य: FreepiK)
-
युरिक अॅसिडची पातळी अनेक दिवस राहिली तर कालांतराने त्वचेखाली गाठ निर्माण होते, ज्याला टोफी म्हटले जाते. यावर वेळीच उपचार घ्यावा. (फोटो सौजन्य: FreepiK) -
अनेकदा या आजाराचा सामना करत असताना सांध्यावरील त्वचा लाल किंवा जांभळी होऊ शकते. तिथे सूजही येऊ शकते. (फोटो सौजन्य: FreepiK) -
त्वचेमध्ये सूज असल्यामुळे त्वचा खूप घट्ट आणि चमकदार होऊ शकते. कारण, सूजलेल्या भागांवरील त्वचा ताणली जाते किंवा तिथे अतिरिक्त द्रव जमा होतो. (फोटो सौजन्य: FreepiK)
-
युरिक अॅसिडची पातळी जास्त राहिल्याने किंवा जळजळ झाल्यामुळे हायपरपिग्मेंटेशन होऊ शकते.(फोटो सौजन्य: FreepiK)
-
काही रुग्णांमध्ये त्वचा सोलल्यासारखी होऊ शकते. कारण, युरिक अॅसिडच्या उच्च पातळी दरम्यान त्वचेवर दबाव पडतो. (फोटो सौजन्य: FreepiK)
त्वचेवरही दिसून येतात युरिक अॅसिडचे गंभीर संकेत; वेळीच व्हा सावध, नाहीतर…
High Uric Acid: युरिक अॅसिड हळूहळू हाडांमध्ये आणि सांध्यांमध्ये साचते आणि नंतर गाठींसारख्या असह्य वेदनादायक आजाराचे कारण ठरते.
Web Title: Serious signs of uric acid are also visible on the skin be careful sap