-
दररोज सकाळी लवकर उठणे हे आपल्यापैकीच अनेक जणांसाठी कठीण काम आहे. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कितीही लवकर उठण्याचा प्रयत्न केला तरी बऱ्याच जणांना सकाळी लवकर उठणे कठीण वाटते, अलार्म बंद करून ते पुन्हा झोपतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
परंतु सकाळी उशिरा उठण्याची सवय अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. या सवयीचे आरोग्यावर अनेक नकारात्मक परिणाम होऊ शकतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
कोणत्याही परिस्थितीत व्यक्तीने किमान ७ ते ८ तास झोपलेच पाहिजे. नाहीतर काही गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सकाळी उशिरा उठल्याने आपल्या दिवसाचे संपूर्ण चक्रही उशिराच सुरु होते. नाश्ता, जेवण यासर्वांचा वेळ बदलला जातो. सकाळी उशिरा उठल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होते. (फोटो सौजन्य: Freepik)
-
अपूर्ण झोपेमुळे हाय ब्लड प्रेशरची शक्यता निर्माण होते. अनेक अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक रात्री उशिरापर्यंत जागतात त्यांना इतर लोकांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशर होण्याचा धोका अधिक असतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
ज्यांना सकाळी उशिरा उठण्याची सवय असते, त्यांची मेटॅबॉलिझम क्रिया मंदावते. याने कॅलरी बर्न होण्यास अडचणी निर्माण होतात. परिणामी, शरीरात फॅट्स जमा होतात आणि लठ्ठपणा वाढू लागतो. (फोटो सौजन्य: Freepik)
-
सकाळी उशिरा उठण्याने पचनशक्ती मंदावते. यामुळे पोट फुगणे, आम्लपित्त यासारख्या समस्या उद्भवतात. (फोटो सौजन्य: Freepik)
-
(फोटो सौजन्य: Freepik)
सकाळी उशिरा उठणं हलक्यात घेऊ नका, कालांतराने होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार
Don’t Take Waking Up Late: सकाळी उशिरा उठल्याने आपल्या दिवसाचे संपूर्ण चक्रही उशिराच सुरु होते.
Web Title: Dont take waking up late in the morning lightly because may increase illness sap