-
भारतातील स्थानिक फळे
भारतात अशी शेकडो अद्वितीय फळे आहेत की, जी खूप कमी प्रमाणात ओळखली जातात. ही फळे पौष्टिक, हंगामी आणि चवीने परिपूर्ण अशी असून, ती आरोग्यदायी जीवनासाठी खूपच फायदेशीर आहेत. -
बेल (लाकडी सफरचंद)
भारतामध्ये आढळणारे बेलफळ हे व्हिटॅमिन सी, फायबर व अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असे फळ आहे. ते पचन सुधारण्यास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. -
चिकू
गोड आणि फायबरने भरलेला चिकू पचन सुधारतो, ऊर्जा वाढवतो आणि अ व क जीवनसत्त्वे प्रदान करतो. हे स्थानिक फळ आरोग्यदायी आहारासाठी एक उत्तम पर्याय आहे. -
भारतीय अंजीर
भारतातील काही भागांत आढळणारे कमी ओळखली जाणारी अंजीराची ही जात फायबर, अँटिऑक्सिडंट्स व खनिजांनी भरलेली आहे. हे फळ पचनास मदत करते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवू शकते. -
जांभूळ
सामान्य जांभळापेक्षा स्थानिक जांभूळ अँथोसायनिनने समृद्ध आहे. ते रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी उपयुक्त आहे. -
करवंद
व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले करवंद हे फळ पचनक्रियेत मदत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. ते लोणचे किंवा जाम बनवण्यासाठीदेखील वापरले जाते. -
फालसा
उत्तर भारतात लोकप्रिय लहान जांभळ्या बेरी फालसामध्ये व्हिटॅमिन सी, लोह व अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आहेत. ते शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.
जेवताना तुमच्या ताटात नक्की असायला हवीत ‘ही’ भारतीय फळे!
हंगामी आणि आरोग्यदायी जाणून घ्या स्थानिक फळांचे फायदे
Web Title: These 6 must have indian superfruits for your plate nutritious seasonal and healthy health tips svk 05