-
धमन्यामध्ये कॅल्शियमचा साठा : मजबूत हाडे आणि उत्तम स्नायुबलासाठी कॅल्शियमची गरज असते. मात्र, त्याचे कॅल्शियमचे प्रमाण जास्त झाल्यास फायदे होण्याऐवजी नुकसानच होऊ शकते. शरीरातील अतिरिक्त कॅल्शियम हाडांऐवजी धमन्यांमध्ये साचते. मग त्यामुळे धमन्या कडक होतात आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.
-
पूरक गोळ्या की नैसर्गिक स्रोत? दूध, पालेभाज्या, तीळ व बियांसारख्या अन्नातून मिळणारे कॅल्शियम शरीरात हळूहळू शोषले जाते आणि ते सुरक्षित असते. पण, गोळ्यांच्या स्वरूपातील पूरक कॅल्शियम अचानक रक्तात वाढते, ज्यामुळे हृदयावर ताण येतो.
-
रक्तवाहिन्यांमध्ये कॅल्सिफिकेशनचा धोका : अतिरिक्त कॅल्शियममुळे रक्तवाहिन्या आणि हृदयाच्या झडपांमध्ये कॅल्सिफिकेशन होते. या प्रक्रियेमुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि हृदयाला रक्त पंप करणे कठीण होते.
-
सुरक्षित कसे राहाल? कॅल्शियमचे सेवन मुख्यत्वे अन्नातूनच मिळेल, असे पाहा; पूरक गोळ्यांवर अवलंबून राहू नका. त्यासोबत व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम आणि नियमित व्यायाम यांचा समतोल ठेवा. कोणताही पूरक आहार (सप्लिमेंट) घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
-
हृदयविकाराचा झटका येण्याच्या धोक्यात वाढ : अनेक संशोधनांनुसार, अन्नातून मिळणारे कॅल्शियम सुरक्षित असते. परंतु, गोळ्यांमधील जास्त कॅल्शियममुळे धमन्यांमध्ये प्लाक तयार होऊन, ब्लॉकेज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
-
खनिजांचे संतुलन बिघडते: कॅल्शियमचे अति सेवन शरीरातील मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण बिघडवू शकते. हे दोन्ही खनिज घटक हृदयाची लय आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात.
-
निष्कर्ष — प्रमाणातच आरोग्य : कॅल्शियम आरोग्यासाठी महत्त्वाचे असले तरी त्याचे अति सेवन धोकादायक ठरू शकते. त्यामुळे संतुलित आहार, पुरेसे सूर्यस्नान आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच पूरक आहाराचे सेवन करणे हितकारक आहे. (सर्व फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
कॅल्शियमचे अति सेवन हृदयासाठी ठरू शकते धोकादायक! जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
कॅल्शियम हाडांसाठी फायदेशीर असले तरी त्याचे अति सेवन धमन्यांमध्ये साठा निर्माण करून हृदयविकाराचा धोका वाढवू शकते. अन्नातून मिळणारे कॅल्शियमच अधिक सुरक्षित मानले जाते.
Web Title: Excess calcium intake heart disease risk artery calcification health tips svk 05