-
दुपारच्या जेवणानंतर डोळ्यांवर झोप येतेय का? मग थोडीशी दुपारची झोप म्हणजेच पॉवर नॅप, तुमचं मन आणि शरीर दोन्हींना ताजेतवानं करू शकते. या अल्प झोपेचे हे काही आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे नक्की जाणून घ्या –
-
भावनिक आरोग्य सुधारते थोड्या वेळासाठी घेतलेली झोप तुमचा मूड सुधारते, चिडचिड कमी करते आणि दिवसातील ताणतणाव दूर करण्यास मदत करते. काही मिनिटांतच मेंदूला मिळतो नवा उत्साह आणि ताजेपणा.
-
ऊर्जा वाढवते आणि थकवा कमी करते पॉवर नॅप घेतल्याने शरीराची ऊर्जा पुन्हा वाढते. तसेच त्या छोट्या झोपेने दुपारच्या वेळी येणारा थकवा आणि कंटाळा कमी होतो. त्यामुळे कामात लक्ष केंद्रित होते आणि उत्पादकता वाढते.
-
हृदयाचे आरोग्य राखते संशोधनानुसार, नियमित लहान झोप घेतल्याने रक्तदाब नियंत्रित राहतो आणि मानसिक ताण कमी होतो. त्यामुळे दीर्घकाळात हृदय निरोगी राहण्यास मदत मिळते.
-
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते अल्पकाळ झोप घेतल्याने शरीरातील पेशी दुरुस्त होतात आणि रोगप्रतिकारक प्रणाली बळकट होते. त्यामुळे सर्दी, तापअशा लहान आजारांपासूनही संरक्षण मिळते.
-
स्मरणशक्ती आणि शिकण्याची क्षमता वाढवते २० ते ३० मिनिटांची झोप मेंदूतील माहिती साठवण्याची प्रक्रिया सुधारते. त्यामुळे नवीन गोष्टी लक्षात ठेवणे, शिकणे आणि लक्ष केंद्रित करणे अधिक सोपे होते.
-
योग्य झोपेसाठी काही टिप्स पॉवर नॅपचा सर्वाधिक फायदा घ्यायचा असेल, तर ती झोप २०-३० मिनिटांपुरतीच ठेवा. दुपारी ३ नंतर झोप घेऊ नका; अन्यथा रात्रीची झोप बिघडू शकते. अल्प झोपेसाठी शांत आणि आरामदायी जागा निवडा म्हणजे झोप पटकन लागेल. (सर्व फोटो सौजन्य : अनस्प्लॅश)
दुपारच्या जेवणानंतर झोप येतेय? ‘पॉवर नॅप’ तुमच्या आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का?
फक्त २० मिनिटांच्या ‘पॉवर नॅप‘ने वाढते ऊर्जा, सुधारते मन:स्थिती आणि हृदयही राहते तंदुरुस्त
Web Title: The ultimate guide to afternoon nap health benefits for body and mind health tips svk 05