-
ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो सर्वात वेगवान गतीने एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तो एका राशीमध्ये जवळपास अडीच दिवस राहतो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
त्यामुळे बऱ्याचदा काही राशींमध्ये चंद्राची दुसऱ्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते. या युतीचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ तर काही राशींवर अशुभ परिणाम पाहायला मिळतो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
शिवाय त्यातून शुभ संयोग आणि राजयोग निर्माण होतात, ज्याचा मानवी जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होतो.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, येत्या दिवाळीत २१ ऑक्टोबर रोजी चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे, हा राजयोग दिवाळीतच निर्माण होत असल्याने या काळात देवी लक्ष्मीची विशेष कृपा पाहायला मिळेल. १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी हा राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी हा राजयोग भौतिक सुखाचा वर्षाव करणार असेल. हा योग तुमच्या भौतिक सुख आणि वाहनाच्या स्थानावर निर्माण होत आहे. यामुळे तुमची आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
कन्या राशीच्या लोकांसाठी महालक्ष्मी राजयोग अत्यंत सकारात्मक फळ देणारा असेल. हे गोचर तुमच्या धन आणि वाणीच्या स्थानावर असेल. ज्यामुळे आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
महालक्ष्मी राजयोगाचा प्रभाव मकर राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायी सिद्ध होईल. हा योग तुमच्या कर्म भावात निर्माण होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
पैसा येणार पैसा… ‘लक्ष्मीपूजना’च्या दिवशी पैशांचा पाऊस पडणार, ‘महालक्ष्मी राजयोग’, ‘या’ तीन राशींचा पुढील वर्षभर बँक बॅलन्स वाढवत राहणार
Mahalakshmi Rajyog: पंचांगानुसार, येत्या दिवाळीत २१ ऑक्टोबर रोजी चंद्र आणि मंगळाच्या युतीमुळे महालक्ष्मी राजयोग निर्माण होत आहे, हा राजयोग दिवाळीतच निर्माण होत असल्याने या काळात देवी लक्ष्मीची विशेष कृपा पाहायला मिळेल.
Web Title: Chandra and mangal yuti make mahalaxmi rajyog in diwali laxmi pujan day kark kanya and makar zodic get more success in career and love sap