-

कर्करोग टाळण्यासाठी व्यायाम, झोप, तणाव नियंत्रण आणि योग्य आहार यांच्यात समतोल राखणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते, आहार शरीरातील पेशींच्या आरोग्यावर थेट परिणाम करतो. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
तज्ज्ञांनी सांगितले तीन प्रमुख अन्नपदार्थ कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी डॉ. तरंग कृष्ण यांनी शिफारस केलेले तीन अन्नपदार्थ खालीलप्रमाणे : (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
ब्रोकली – हिरवी पॉवरहाऊस भाजी ब्रोकलीमध्ये ‘ग्लुकोसिनोलेट्स’ हे घटक असतात, जे शरीरातून विषारी द्रव्ये बाहेर टाकतात आणि पेशींचे नुकसान टाळतात. हलके वाफवून खाल्ल्यास सर्वाधिक फायदा होतो. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
पर्याय म्हणून फ्लॉवरही उपयोगी ब्रोकली न मिळाल्यास फ्लॉवरही वापरू शकता. त्यातही शरीर शुद्ध करणारे आणि पेशी दुरुस्त करणारे गुणधर्म आहेत. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
ब्लूबेरी – शरीरासाठी अँटीऑक्सिडंटचा खजिना ब्लूबेरीमध्ये ‘अँथोसायनिन्स’ व ‘फ्लेवोनॉइड्स’ असतात, जे पेशींचे नुकसान टाळतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
ब्लूबेरीऐवजी सफरचंद खा सफरचंदाच्या सालीत ‘क्वेर्सेटिन’सारखे घटक असतात, जे सूज कमी करतात आणि शरीराला संरक्षण देतात. ते तुम्ही कच्चे खाऊ शकतो किंवा त्याचा सॅलडमध्ये वापर करू शकता. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
टोमॅटो – लाइकोपीनचा समृद्ध स्रोत टोमॅटोमध्ये ‘लाइकोपीन’ हा घटक असतो, जो प्रोस्टेटसह अनेक प्रकारच्या कर्करोगापासून बचाव करतो. शिजवलेला टोमॅटो अधिक फायदेशीर ठरतो. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
दररोजच्या आहारात सहज समाविष्ट करा आठवड्यात दोन-तीनदा ब्रोकली, रोज एक सफरचंद किंवा मूठभर ब्लूबेरी वा नियमितपणे टोमॅटो वापरल्यास शरीरात नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रिया चालू राहते आणि कर्करोगापासून बचाव होतो. (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
-
(टीप : येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.) (फोटो सौजन्य : पेक्सल्स)
तज्ज्ञांच्या मते कॅन्सर टाळण्यासाठी ‘या’ ३ पदार्थांचा आहारात समावेश करा!
Cancer Prevention Tips : तज्ज्ञ डॉ. तरंग कृष्ण यांचा सल्ला- ब्रोकोली, ब्लूबेरी व टोमॅटो रोजच्या आहारात ठेवा, कॅन्सरचा धोका होतो कमी
Web Title: Cancer prevention diet dr tarang krishna tips health benefits natural ways to reduce cancer risk svk 05