-

अॅव्होकॅडोमध्ये उच्च प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वजन नियंत्रणात मदत होते. (सर्व फोटो सौजन्य : Pexels)
-
अॅव्होकॅडो हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अॅव्होकॅडो खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करते.
-
अॅव्होकॅडो टोस्ट टोस्ट केलेल्या ब्रेडवर पिकलेला अॅव्होकॅडो मॅश करून लावा. वर थोडे मीठ, काळी मिरी पूड, चिली फ्लेक्स घालून लगेच खा. हा सर्वात सोपा आणि आरोग्यपूर्ण नाश्ता आहे.
-
अॅव्होकॅडो सॅलड अॅव्होकॅडोचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, काकडी, कोथिंबीर एकत्र करा. त्यावर लिंबू रस, मीठ आणि काळी मिरी घालून हलक्या हाताने मिक्स करा.
-
अॅव्होकॅडो स्मूदी अॅव्होकॅडोचे तुकडे, दूध, केळ, मध किंवा खजूर आणि थोडे बर्फ एकत्र करून ब्लेंडरमध्ये बारीक करा. ही एक पौष्टिक आणि पोट भरणारी स्मूदी आहे.
-
अॅव्होकॅडो डीप पिकलेला अॅव्होकॅडो मॅश करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू रस आणि चवीनुसार मीठ मिक्स करा. हा डीप तुम्ही चपाती, टोस्ट किंवा भाज्यांबरोबर खाऊ शकता.
Avocado Recipes: अॅव्होकॅडोपासून बनवा ‘हे’ झटपट होणारे पदार्थ; शरीराला मिळतील असंख्य फायदे
अॅव्होकॅडो हे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
Web Title: Try these healthy recipes made from avocado fruit read its health benefits sdn