• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. when to apply sunscreen before or after moisturizer asp

चेहऱ्यावर पहिले मॉइश्चरायझर लावायचं की सनस्क्रीन? जाणून घ्या अन्यथा होतील गंभीर परिणाम

What goes first moisturizer or sunscreen : जर तुम्ही एका हातात मॉइश्चरायझर व दुसऱ्या हातात सनस्क्रीन घेऊन आरशासमोर उभे आहात आणि विचार करीत असाल की, यापैकी नक्की पहिल्यांदा काय लावायचं? तर तुम्ही तसे संभ्रमात पडणारे एकटे नाही आहात.

Updated: October 31, 2025 10:30 IST
Follow Us
  • Apply-Moisturizer-Before-or-After-Sunscreen
    1/8

    मुलींच्या दिनचर्येतील सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्किनकेअर. पण, अनेकदा स्किनकेअर म्हणजे चेहऱ्याची काळजी घेताना चुकीचे प्रॉडक्ट्स आधी लावल्यावर चेहऱ्यावर कदाचित त्याचे दुष्परिणाम दिसू शकतात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 2/8

    अनेक लोकांना योग्य क्रमाची माहिती नसते. त्यामुळे जर तुम्ही एका हातात मॉइश्चरायझर व दुसऱ्या हातात सनस्क्रीन घेऊन आरशासमोर उभे आहात आणि विचार करीत असाल की, यापैकी नक्की पहिल्यांदा काय लावायचं? तर तुम्ही तसे संभ्रमात पडणारे एकटे नाही आहात. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 3/8

    यासंबंधित जाणून घेण्यासाठी @indiatvnews ने क्लिनिकमधील ॲस्थेटिक फिजिशियन व ओटेरिया येथील तज्ज्ञ डॉक्टर मिली यांच्याशी संपर्क साधला. ज्यांनी लक्षात राहील असं सोपं उत्तर आणि मत शेअर केलं. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 4/8

    आधी मॉइश्चरायझर आणि मग सनस्क्रीन – त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या सुरू करणाऱ्या प्रत्येकासाठी हा सर्वांत सामान्य मुद्दा आहे. पण, डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे मॉइश्चरायझरला प्रथम स्थान दिलं पाहिजे आणि सनस्क्रीन ही नंतर लावली पाहिजे. डॉक्टरांनी या प्रश्नाचं उत्तर देताना सँडविच बनविण्याच्या प्रक्रियेची उदाहरणास्तव निवड केली. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 5/8

    मॉइश्चरायझर म्हणजे सँडविचच्या आतलं सारण; जे आधी लावलं की, तुमच्या त्वचेला पोषण देतं. तर सनस्क्रीन हे ब्रेडच्या वरच्या स्लाईससारखं असतं; जे सर्व काही एकत्र धरून ठेवतं आणि त्याचं संरक्षण करतं. त्यामुळे जर आपण आधी ब्रेडचा वरचा भाग ठेवला (म्हणजे सनस्क्रीन आधी लावलं), तर आतलं सारण नीट बसत नाही (म्हणजे मॉइश्चरायजरचा काहीच फायदा होत नाही). (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 6/8

    डॉक्टरांचे मते, मॉइश्चरायजर त्वचेला मऊ, हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते; तर सनस्क्रीन सूर्यापासून संरक्षण करते. जर तुम्ही आधी सनस्क्रीन आणि मग मॉइश्चरायजर तर मॉइश्चरायजर त्वचेत चांगलं शोषलं जाणार नाही आणि सनस्क्रीन तुमच्या त्वचेचं संरक्षण करू शकणार नाही. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 7/8

    त्वचेची काळजी कशी घ्यावी?
    डॉक्टर मिली यांनी वेळेचं महत्त्वदेखील अधोरेखित केलं. नेहमी प्रथम मॉइश्चरायजर लावा, ते त्वचेत शिरेण्यासाठी एक मिनिटाचा अवधी द्या. नंतर वरून सनस्क्रीन लावा अगदी मानेलाही लावायला विसरू नका. त्याचप्रमाणे बाहेर असताना दर तीन ते चार तासांनी पुन्हा ते लावा. ही एक छोटी गोष्ट तुमची त्वचा चांगली आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकणार आहे. (फोटो सौजन्य: @Freepik)

  • 8/8

    क्रम का महत्त्वाचा असतो?
    तुम्ही तुम्ही वापरीत असलेली उत्पादने कोणत्या क्रमाने लावता यावर त्याचा चेहऱ्यावर होणारा परिणाम अवलंबून असतो. सनस्क्रीन तुमच्या चेहऱ्याचे सूर्याच्या किरणांपासून संरक्षण करते. पण, हेच जर तुम्ही मॉइश्चरायजर, मेकअप किंवा दुसरं काही आधी लावलं, तर सनस्क्रीनचं काम कमी होतं. त्यामुळे सनस्क्रीन शेवटी लावणे योग्य ठरेल. (फोटो सौजन्य: @Freepik)

TOPICS
लाइफस्टाइलLifestyleलाइफस्टाइल न्यूजLifestyle Newsहेल्दी लाइफस्टाइलHealthy Lifestyle

Web Title: When to apply sunscreen before or after moisturizer asp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.