-

ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांच्या राशी परिवर्तनाने शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
ज्योतिषशास्त्रामध्ये बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. तर सूर्याला पिता, मान-सन्मान आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानले जाते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
सूर्य ग्रह प्रत्येक महिन्यामध्ये राशी परिवर्तन करतो. ज्यामुळे कोणत्याना कोणत्या ग्रहाबरोबर त्याची युती निर्माण होते. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
पंचांगानुसार, सध्या सूर्य तूळ राशीत विराजमान असून तो येत्या १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. १६ डिसेंबरपर्यंत तो याच राशीत विराजमान असेल. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम) -
बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी असेल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल किंवा नोकरीत पगारवाढ होईल. कुटुंबात आनंदी आनंद असेल.आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
बुधादित्य राजयोगाचा वृश्चिक राशींच्या व्यक्तींवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
कन्या राशीसाठी बुधादित्य राजयोग खूप अनुकूल सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. (फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
-
(फोटो सौजन्य: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
सूर्य-बुध देणार छप्परफाड पैसा! ‘बुधादित्य राजयोग’ ‘या’ तीन राशींवर पैशांचा पाऊस पाडणार, सुख-संपत्ती अन् नोकरी-व्यवसायात भरभराट देणार
Surya and Budh Make Budhaditya Rajyog: पंचांगानुसार, सध्या सूर्य तूळ राशीत विराजमान असून तो येत्या १६ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजून ४४ मिनिटांनी वृश्चिक राशीमध्ये प्रवेश करणार आहे. १६ डिसेंबरपर्यंत तो याच राशीत विराजमान असेल.
Web Title: Surya and budh make budhaditya rajyog 25 these three zodic get success money and career growth sap