• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • जिंकलो रे!
  • QUIZ-अशी ही बनवाबनवी
  • राज ठाकरे
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. lifestyle gallery
  4. cooking in clay pot benefits in marathi aam

मातीच्या भांड्यांमध्ये शिजवलेल्या भाज्या तुम्ही चाखल्या आहेत का? जाणून घ्या त्याचे फायदे

Benefits Cooking In Clay Pot: मातीच्या भांड्यांच्या नैसर्गिक चवीमुळे, आता बाजारात अनेक प्रकारची मातीची भांडी उपलब्ध होत आहेत.

November 3, 2025 14:26 IST
Follow Us
  • Benefits of cooking in clay pots
    1/6

    नॉन-स्टिक आणि एअर-फ्रायर स्वयंपाक पद्धतीचे धोके बरेच लोक ओळखत आहेत आणि पुन्हा मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्यच्या पारंपारिक पद्धतीकडे वळत आहेत. मातीच्या भांड्यांच्या नैसर्गिक चवीमुळे, आता बाजारात अनेक प्रकारची मातीची भांडी उपलब्ध होत आहेत.

  • 2/6

    मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचे फायदे : मातीच्या भांड्यांचे मूल्य आपण कमी लेखतो कारण ते खूप स्वस्त असतात. पण, मातीच्या भांड्यांमध्ये शिजवलेले अन्न खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मातीच्या भांड्यांमध्ये दीर्घकाळ उष्णता टिकवून ठेवण्याची क्षमता असते. ते कमी आचेवर स्वयंपाक करण्यासाठी अतिशय योग्य आहेत.

  • 3/6

    मातीच्या भांड्यात स्वयंपाक करण्याचे फायदे : मातीच्या भांड्यात स्वयंपाक करताना, अन्नाला नैसर्गिक मातीचा सुगंध येतो, ज्यामुळे अतिरिक्त चव येते. हे अन्नाची आम्लता आणि क्षारता संतुलित करण्यास आणि अन्नाची पीएच पातळी राखण्यास मदत करते.

  • 4/6

    मातीच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक करण्याचे फायदे: अन्नातील पोषक तत्वे नष्ट न होता अन्न व्यवस्थित शिजते. मातीच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवण्यासाठी फक्त थोडेसे तेल लागते. अन्न सर्व बाजूंनी समान रीतीने शिजते. ते शिजवल्यानंतरही अन्न बराच काळ गरम राहते. नॉन-स्टिक भांड्यांमधील रसायने पर्यावरणाला हानी पोहोचवू शकतात. परंतु मातीच्या भांड्यांमुळे कोणतेही नुकसान होत नाही.

  • 5/6

    मातीची भांडी घरी आणल्यानंतर हे करा: दुकानातून खरेदी केलेले काही मातीची भांडी आधीच योग प्रक्रिया केलेली असतात. पण रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांमधून खरेदी केलेल्या भांड्यांना घरी आणल्यानंतर त्यावर काही प्रक्रिया करणे आवश्यक असते.

  • 6/6

    मातीची भांडी घरी आणल्यानंतर हे करा: प्रथम, खरेदी केलेली मातीची भांडी साबण न वापरता पाण्यात पूर्णपणे बुडवा. त्यांना किमान ८ ते १४ तास पाण्यात भिजवा. असे केल्याने, माती पाणी शोषून घेते, त्यामुळे भांड्यांची उष्णता कमी होते आणि ती थंड राहतात.

TOPICS
स्वयंपाकCooking

Web Title: Cooking in clay pot benefits in marathi aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.